Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
गोवा

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाने पांघरली धुक्याची चादर; गोव्यात वाढला गारटा!

Mumbai-Goa Highway: राज्यात थंडी उशिरा दाखल झाली असली, तरी मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानाचा पारा 19.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यात थंडी उशिरा दाखल झाली असली, तरी मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानाचा पारा 19.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत थंडी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरही धुक्याची चादर दिसली. सकाळच्या वेळी दाट धुके महामार्गावर दिसले. याचाच परिणाम म्हणून महामार्गावरील वाहतूक मंदावलेली पाहायला मिळाली.

दरम्यान, हवेत गारटा वाढल्याने दुपारी 11 वाजेपर्यंत महामार्ग परिसरात धुके कायम राहते. त्यामुळे दृश्यमानता कमी होत असून अपघाताची भिती संभावते. मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) माणगाव परिसरात सकाळच्या वेळी 24 डिग्री सेल्सिअसवर असलेले तापमान रात्रीच्या वेळी 12 डिग्री सेल्सिअसरवर पोहोचत आहे. मागील काही दिवसांपासून महामार्गावर धुक्याची चादर कायम असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे लागते.

कमी दाबाचा पट्टा ओलांडणार किनारा

दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (डिप्रेशन) तामिळनाडूसह (Tamil Nadu) परिसरात पावसाचा जोर वाढला असून हे क्षेत्र शनिवारी (ता. 30) सकाळी तामिळनाडूतील महाबलीपूरम आणि पुदुच्चेरीतील कराईकलदरम्यान किनारा ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. सहा तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र ताशी नऊ किमी वेगाने उत्तर दिशेला सरकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT