Ravindra Bhavan Margao  Dainik Gomantak
गोवा

Vishwakarma Yojana: 10 केंद्रांवर विश्‍वकर्मा प्रशिक्षण

Vishwakarma Yojana: मडगावात 4 रोजी शुभारंभ मंत्री राजीव चंद्रशेखर यांची उपस्‍थिती

दैनिक गोमन्तक

Vishwakarma Yojana: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या विश्‍वकर्मा योजनेअंतर्गत राज्यातील 29 हजारांहून अधिक कलाकार, कारागिरांनी अर्ज केले असून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ 4 जानेवारी रोजी रवींद्र भवन मडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याचे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

ते मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान सिक्वेरा म्हणाले गोवा हे पहिले राज्य आहे जे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधून या योजने अंतर्गत कारागिरांनी, कलाकारांनी नोंदणी केली आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभादरम्यान पंतप्रधान विश्‍वकर्मा गुरू सन्मान देण्यात येणार आहे. राज्यातील कला आणि कारागिरीच्या क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला या सन्मान प्रदान करण्यात येईल.

शिवणकला प्रशिक्षण

  • विश्‍वकर्मा योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात शिंपी (शिवणकला) प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

  • राज्यातील 9 आयटीआय आणि मत्स्य संचालनालय अशा एकूण 10 केंद्रावर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इतर कारागीर प्रशिक्षण टप्या-टप्याने सुरू केले जाणार सल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.

अर्थसाहाय्य देणार!

विश्‍वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतल्यावर त्यांना प्रशस्तिपत्र, ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कामासाठीचे साहित्य घेण्यासाठी 15 हजार रुपये देण्यात येतील. कलाकार-कारागिरांना कौशल्य प्रदान करणे, नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे आणि कारागिरांना व्यासपीठ मिळवून देणे, या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या प्रशिक्षण शुभारंभ कार्यक्रमावेळी मिनी जॉब फेअरचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी मुलाखती घेतल्या जातील. ईडीसीचा स्टॉल असेल तसेच अप्रेंटिसशिप नोंदणी देखील करता येणार असल्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT