Vishwajit Rane | Michael Lobo | Goa Congress News | Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane: बोंडला अभयारण्यासाठी वाघ जोडीचा प्रस्ताव मागे

गोवा राज्यातील एकमेव असणाऱ्या 'बोंडला'साठीच्या वाघांचा प्रस्ताव मागे

Sumit Tambekar

गेल्या मे महिन्यात गोवा राज्यातील एकमेव असणाऱ्या बोंडला प्राणीसंग्रहालयात वाघाच्या नव्या जोडीला घेण्याचा प्रस्ताव होता. यासाठी नागपूर-महाराष्ट्रातील रेस्क्यू सेंटरमधून वाघांची नवीन जोडी आणण्यासाठी वन विभागाने सरकारकडे मंजुरी मागितली होती. यावरुन वनमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

( Vishwajit Rane says proposal of two tigers for Bondla sanctuary withdrawn)

वनमंत्री राणे यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, बोंडला अभयारण्याची सद्यस्थिती पाहता हा प्रस्ताव काही काळ स्थितीत हा प्रस्ताव थांबवणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राकडून मंजूर झालेले 2 वाघ आम्ही घेतले नाही अशी माहिती वनमंत्री राणे यांनी दिली आहे.

उद्यानात वाघ नसणे अशोभनीय

सध्या राज्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. पर्यावरणप्रेमी पर्यटकांना नेहमीच बोंडला उद्यानाचे आकर्षण राहिले आहे. अशावेळी उद्यानात वाघ नसणे हे अशोभनीय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदिस्त जागेची केली व्यवस्था

यापूर्वीच वाघांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बंदिस्त जागेची व्यवस्था केलेली आहे. याबबात बोलताना मुख्य वन्यजीव वॉर्डन संतोष कुमार म्हटले होते की, "हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला मात्र केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची (सीझेडए) परवानगी घेतली जाणार होती. यासाठी राज्यसरकारने केंद्राकडे प्रस्ताव ही केला होता.

मात्र बोंडला अभयारण्याची सद्य स्थिती पाहता हा प्रस्ताव वनमंत्र्यांकडूनच मागे घेण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामूळे वाघांच्या नव्या जोडीची प्रतिक्षा गोवेकरांना आणखी काही काळ करावी लागणार आहे.

राणा आणि संध्या या वाघांच्या जोडीला गमावले

बोंडला प्राणिसंग्रहालयाने अनुक्रमे डिसेंबर 2016 आणि जुलै 2017 मध्ये प्राणिसंग्रहालयाचे प्रमुख आकर्षण असलेल्या राणा आणि संध्या या वाघांच्या पूर्वीच्या जोडीला गमावले. दोन्ही प्राण्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणास्तव झाला होता. 2009 मध्ये विशाखापट्टणमच्या इंदिरा गांधी प्राणीशास्त्र उद्यानातून ही जोडी आणण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT