म्हापसा अर्बन को.ऑप.बँक ऑफ गोवा लिमिटेडने, म्हापसा शहरातील स्वतःची मालमत्ता असलेल्या ‘इस्सार ट्रेड सेंटर’ मधील ३० दुकानांची विक्री तसेच तळमजल्यावरील आणि दुसऱ्या मजल्यावरील एकूण २६ वेगळ्या दुकानांची विक्री करण्याची घोषणा बँकेचे लिक्विडेटर अँथनी डिसा यांनी वृत्तपत्रातून जाहिरातीद्वारे केली आहे.
यातील 26 दुकाने स्वतंत्रपणे विकली जाणार आहेत. तर 30 दुकाने ही लॉट पद्धतीने विकली जातील. एकूण 56 दुकानांचा लिलाव करुन ही बँक (Bank) निधी उभारणार आहे. यासंदर्भात लिक्विडेटरकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. इच्छुकांनी लिलावासाठी दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी, दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. इच्छुकांना जर विशेष माहिती हवी असल्यास त्यांनी जनअर मॅनेजर किंवा रिकवरी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन लिक्विडेटर डिसा यांनी केले आहे.
म्हापसा अर्बन बँकेच्या सर्व खातेदारांचे पैसे बँकेने परतफेड केले आहे. तसेच पाच लाख रुपयांवरची रक्कम ही हप्त्याहप्त्यांनी परत केली जात आहे.म्हापसा अर्बन बँक जरी दिवाळखोरीत गेल्याचे सरकारने जाहीर केले असले,तरी या बँकेकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता (Asset) आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.