Goa Forest Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Forest Fire : म्हादई अभयारण्यातील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्राकडून मदत : विश्वजित राणे

पंतप्रधान कार्यालयाचे आगीच्या परिस्थितीवर जवळून लक्ष

Rajat Sawant

Goa Forest Fire : पंतप्रधान कार्यालय म्हादई वन्यजीव अभयारण्याच्या जंगलातील आगीच्या परिस्थितीवर स्वतः जवळून लक्ष ठेवून आहे. संरक्षण मंत्रालय पूर्ण सहकार्य करेल. जंगलातील आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरसह आम्हाला संपूर्ण संरक्षण सहाय्य प्रदान केल्याबद्दल संपूर्ण गोवा राज्य अत्यंत आभारी आहे.”

असे गोव्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी सांगितले. याबाबतची माहिती त्यांनी ट्विट करत दिली. म्हादई वन्यजीव अभयारण्य आणि लगतच्या काही ठिकाणी शनिवारी सातव्या दिवशीही जंगलात आग सुरु आहे.

राणे यांनी सोशल मीडियावर सांगितले की, पंतप्रधान कार्यालय जवळून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संरक्षण मंत्रालय या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ते म्हणाले, “आमच्या जंगलांचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्तक्षेपाबद्दल आणि जंगलातील आग विझवण्यासाठी दोन हेलिकॉप्टरसह आम्हाला संपूर्ण संरक्षण सहाय्य प्रदान केल्याबद्दल संपूर्ण गोवा राज्य अत्यंत आभारी आहे.”

“आम्ही पंतप्रधान कार्यालयाला आगीच्या स्थितीबद्दल दररोज अपडेट ठेवू. शनिवारी म्हादई वन्यजीव अभयारण्यासह विविध ठिकाणी अकरा जंगलात आग लागली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT