Health Minister Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa: निवडणूक जिंकण्यासाठीच लढवली जाणार: विश्वजित राणे

भारतीय जनता पक्षाला पुन्हा गोव्यात सत्तेवर आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाला पुन्हा गोव्यात सत्तेवर आणण्यासाठी शक्य ते प्रयत्न आपले सरकार व आम्ही सर्व भाजपाचे आमदार तथा मंत्री मिळून करणार आहोत. ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढवली जाणार आहे.असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी आज पणजी येथे जागतिक फार्मसी दिन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

आपण वाळपई मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असून आपले वडील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे व गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल आपणाला माहीत नाही. असे याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

दिल्लीतील काही नेते गोव्यात येऊन आरोग्यविषयक बाता ठोकतात त्यानी त्या ठोकने बंद करावे. कारण दिल्लीपेक्षा गोव्यात आरोग्य सुविधा चांगल्या असून देशात गोवा हे एकमेव राज्य मोफत उपचार करणारे आहे. कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी गोवा सरकारने चांगले प्रयत्न केले आहेत. असे सांगून कोरोनाचे नियम पाळणे आणि लस घेणे याद्वारे कोरोना नियंत्रणात येऊ शकतो .असेही विश्‍वजित राणे म्हणाले .

जगात सर्वच देशांमध्ये सध्या व्यवहार सुरू असल्यामुळे आर्थिक व्यवसाय कायम बंद ठेवू शकत नसल्याचे सांगून पर्यटकानी कोरोनाचे नियम पाळावेत दोन्ही डोस घेऊनच गोव्यांमध्ये यावे. असेही राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

आईचा आदर न करणारा व्यक्ती भारतमातेचा काय आदर करणार? राहुल गांधी आई सोनिया गांधींवर ओरडायचे; विश्वजीत राणेंनी सांगितला किस्सा

फिश मिल प्लांटला कुंकळ्ळी पालिकेचा नकार, सरकारने दुर्लक्ष केल्यास थेट आंदोलनाचा इशारा; LoP युरी

Nepal PM Resigned: केपी शर्मा ओली यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा, Gen-Z च्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळमध्ये सत्तांतर

Marcus Stoinis Engagement: मार्कस स्टॉइनिस साराच्या प्रेमात, भर समुद्रात दोघांनी एकमेकांना केलं प्रपोज, पाहा रोमँटिक PHOTOS

SCROLL FOR NEXT