Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

राणेंच्या आवाहनाला प्रतिसाद ; एका दिवसात 35 तक्रारी

दोषींवर कारवाईचा इशारा

दैनिक गोमन्तक

पणजी : नगरनियोजन आणि शहर विकासमंत्री विश्‍वजीत राणे यांनी त्यांच्याकडील खात्यांमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून आपल्या खात्यांच्या संदर्भातील तक्रारी जनतेने थेट आपल्या ईमेलवर पाठवाव्यात, असे आवाहन करताच त्याला मोठा प्रतिसाद लाभला असून पहिल्याच दिवशी तब्बल 35 तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची छाननी करून संबंधित विभागांकडे वर्ग करण्यात येतील. तसेच दोषींवर कठोर कारवाई करणार, असा इशारा राणे यांनी दिला आहे.

नगरनियोजन खात्याचा ताबा घेतल्यापासून मंत्री राणे यांनी या खात्यातील बेकायदा कृतीविरोधात धडक मोहीम राबवली असून, गेल्या सोमवारी राणे यांनी आपला ई-मेल आयडी देत यावर पुराव्यानिशी तक्रार देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी तब्बल 35 तक्रारी आल्या. या तक्रारी तपासल्या जात असून, संबंधित विभागाकडे पाठवल्या आहेत, असे राणे यांनी सांगितले.

तक्रारी समितीकडे वर्ग

राणे यांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पहिल्या दिवशीच 35 तक्रारी आल्या आहेत. यात जमीन रूपांतर, भू-रूपांतर, डोंगर कापणी, शेतांमध्ये मातीचा भराव टाकून जमीन तयार करणे, उतार कापणे, संरक्षित जागांवरील अतिक्रमण यांसारख्या नगरनियोजन खात्याच्या कायदा उल्लंघनाबरोबर वन खात्याशी संबंधित तक्रारी आहेत. या सर्व तक्रारी खात्याच्या समितीकडे वर्ग करण्यात आल्या असून, सर्वांवर कारवाई करणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.

मी दिलेल्या ई-मेलवर पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्याने हा राज्यातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. जनतेने यापुढेही नगरनियोजन खात्यातील गैरकारभारांवर आळा आणण्यासाठी सहकार्य करावे आणि अशाच प्रकारे तक्रारी आल्यास त्याचा निश्चितच विचार केला जाईल.

- विश्वजीत राणे, नगरनियोजन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

Goa Cabinet Changes: 22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

‘PM-CM’ना हटवणारं विधेयक संसदेत सादर, विरोधकांनी अमित शहांना घेरलं; अखेर विधेयक JPC कडे पाठवलं

Viral video Goa: "अरे ChatGPT कोकणी उलय", गोव्यातील तरुणाचा 'हा' व्हिडिओ होतोय Viral

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

SCROLL FOR NEXT