Michael Lobo and Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

लोबोंना पुन्हा ‘नगर नियोजन’चा दणका

रुपांतरित जमिनी मूळ स्वरूपात आणणार : मंत्री विश्‍वजीत राणे

दैनिक गोमन्तक

पणजी : पर्रा, नागवा, हडपडे, कांदोळी आणि कळंगुट परिसरात तब्बल 2 लाख 20 हजार चौरस मीटर शेतजमिनीचे व्यवसायिक जमिनीमध्ये रूपांतर केले आहे. हे जमिनीचे रूपांतर नगर नियोजन आणि महसूल विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे.

त्यामुळे ते रद्द करून मूळ स्वरूपात आणले जाईल अशी माहिती नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना हा पुन्हा नगर नियोजन खात्याचा दणका आहे हे अशी चर्चा सुरू आहे.

याबाबत मंत्री राणे म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष हा तीस टक्के लोकांच्या मालकीचा पक्ष बनला आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी गोव्याला उद्ध्वस्त करून लोकांची काळजी घेत असल्याचा दावा केला होता. मात्र, यामागे त्यांना आपली स्वतःची संपत्ती वाढवण्याचा एकमेव हेतू होता हे आता स्पष्ट झाले आहे. जमीन व्यवहारांमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांपासून राज्याचे रक्षण करायचे असल्यास जबाबदार नागरिक म्हणून आपण त्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. यासंबंधीच्या सर्व फाईल्स टप्प्याटप्प्याने अभ्यासल्या जात आहे. यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल. ही जबाबदारी भाजपसह सरकारने स्वीकारलेली आहे’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायतींची निवडणूक 13 डिसेंबरला? राज्य सरकार करणार घोषणा; प्रभाग फेररचना होणार पूर्ण

Goa Rain: पावसाबाबत नवी अपडेट! पुढच्या आठवड्यात कोसळणार सरी; वाचा ताजा अंदाज

Goa Politics: 'युतीतील पक्षांचे खच्चीकरण हेच काँग्रेसचे ध्‍येय'! आतिषी यांचा स्‍वबळावर लढण्याचा नारा; निवडणुकीत नवे चेहरे उतरवणार

Codar IIT Project: ‘आयआयटी आमका नाका'! कोडार ग्रामस्थ आक्रमक; सत्तरी, सांगे, केपेनंतर राज्य सरकारला मोठा झटका

Rashi Bhavishya 09 September 2025: नोकरीत उत्तम संधी मिळेल, आरोग्याची थोडी काळजी घ्या; मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहा

SCROLL FOR NEXT