Vishwajit Rane Inspection of GMC Dainik Gomantak
गोवा

आवश्यक रुग्णांनाच ‘गोमेकॉ’त पाठवा!

अन्यथा संबंधित डॉक्टरांवर कारवाई; सुविधाही वाढवणार, आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये रुग्णांचा अतिरिक्त ताण असून, बहुतांश वॉर्ड रुग्णांनी भरलेले दिसत आहेत. यासाठी काही रुग्णांना शेजारील सुपर स्पेशालिटी इस्पितळात स्थलांतरित केले असले तरी या रुग्णालयातील साधनसुविधा वाढवण्याला प्राधान्य दिले जाईल.

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातून आवश्यक व तातडीने उपचार गरजेचे असलेल्या रुग्णांनाच गोमेकॉत पाठवावे, अन्यथा संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी बुधवारी दिली.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, या रुग्णालयातील 108, 139, 142, 144, 146 आणि 147 या वॉर्डमध्ये रुग्णांची संख्या रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे येथील संपूर्ण यंत्रणेवर रुग्णांचा ताण आहे.

यासाठी गोमेकॉ येथील साधन-सुविधा वाढवणे गरजेचे आहे, यासंबंधी आरोग्य सचिव आणि मुख्य सचिवांशी चर्चा झाली असून, मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. येथील साधनसुविधा वाढवणे, रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असून, डॉक्टरांनी विशेष प्रयत्न करावेत. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा उपरुग्णालय या ठिकाणाहून जे रुग्ण गोमेकॉत पाठवले जातात त्यांच्या आरोग्यांची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय पाठवू नयेत, अन्यथा संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्री राणे यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT