मडकईत प्रस्थापितांत ‘कांटे की टक्कर’!

सुदिन ढवळीकरांचा ‘वरदहस्त’ कुणाच्या बाजूने?; आज होणार चित्र स्पष्ट
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : मडकई पंचायतीत निवडणुकीचे वारे वाहत असून काल मडकईतून 9 अर्ज भरण्यात आले. 27 जुलै हा निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज अंतिम चित्र स्पष्ट होऊ शकेल. अनेक माजी सरपंच व उपसरपंच रिंगणात असून ‘कॉंटे की टक्कर’ ची शक्यता दिसत आहे.

मडकई पंचायतीवर वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचे अधिराज्य दिसत असून त्यांचा वरदहस्त मिळवण्याकरिता उमेदवारांची घाई दिसत आहे. यातील बहुतेकजण हे सुदिन यांचे समर्थक असल्यामुळे ते कोणावर वरदहस्त ठेवणार हे सांगता येणे कठीण आहे. सध्या तरी सुदिन ढवळीकरांच्या गोटात शांतता असून ऐनवेळी ते आपले ‘हुकुमाचे पत्ते’ काढतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मडकईची सीमा ही एका बाजूला बांदोडा पंचायत तर दुसऱ्या बाजूला कुंकळ्ये- वेलिंग-म्हार्दोळ पंचायत अशी दिसून येते. नवदुर्गा हे गोव्यातील एक प्रमुख मंदिर हे ही या पंचायतीत येते. या पंचायतीत नऊ प्रभाग असून या पंचायतीचा विस्तार तसा अवाढव्य आहे. या पंचायतीच्या पूर्वेला मडकईचा फेरीबोट धक्का असून तिथून कुठ्ठाळीला जाता येते. तसेच या पंचायतीच्या पश्‍चिमेला कुंडई पंचायतीची हद्द सुरू होते. प्रशासक नेमण्यापूर्वी लक्ष्मी वळवईकर या सरपंच होत्या. त्यांनी यावेळीही उमेदवारी दाखल अर्ज केला आहे.

पण तरीही काहीजण त्यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना ते प्राधान्य देतील हे निश्‍चित आहे. यामुळे मगोपला थोडीफार लढत दिली तर ती आरजीच देऊ शकेल, असे प्राथमिकदृष्ट्या दिसते आहे. या पंचायतीतील उमेदवारांची तोंडे सध्या बांदोड्याच्या महालक्ष्मी देवळाकडे वळत आहेत. त्यामुळे सुदिन ढवळीकरांची मर्जी कोणाला लाभते, यावर ठरेल. मात्र बहुतांश प्रश्‍नांची उत्तरे 28 जुलै नंतरच मिळू शकतील.

Sudin Dhavalikar
बार्देशात 6 उमेदवार बिनविरोध; पाच अवैध

मडकई ही पंचायत मडकई मतदारसंघातील एक प्रमुख पंचायत आहे. फोंडा तालुक्यातील कुंडई, बेतोडा बरोबरच मडकई औद्योगिक वसाहत मडकई आयडीसी ही एक महत्त्वाची वसाहत आहे. या वसाहतीत अनेक औद्योगिक आस्थापने असल्यामुळे ही वसाहत गोव्यातील एक प्रमुख औद्योगिक वसाहत समजली जाते. रवी नाईक मुख्यमंत्री असताना म्हणजे 1992 साली ही वसाहत अस्तित्वात आली. आणि आता या वसाहतीची भरभराट होताना दिसत आहे.

सुदिन यांच्या समर्थनावरच या पंचायतीतील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. ‘आरजी’ समर्थकांनी कंबर कसली असून ते ‘मगोप’ला थोडेफार आव्हान देतील, असे दिसते आहे. कॉंग्रेस व भाजप हे दोन प्रमुख पक्ष अगदी ‘थंड’ असून भाजपने सुदिन ढवळीकर यांना ‘मोकळे मैदान’ दिल्यासारखे वाटत आहे. कॉंग्रेसची या पंचायतीत बांधणीच नसल्यामुळे त्यांचा या निवडणुकीत जोर नसणार हे निश्‍चित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com