GMC Goa Dainik Gomantak
गोवा

GMC: गोमेकॉत लवकरच अत्याधुनिक 'मॉलिक्युलर लॅब' आणि 'कॅथ लॅब' होणार सुरू; विश्‍वजीत राणेंची माहिती

VIshwajit Rane: ही सेवा सुरू झाल्यावर रुग्णांची निदान संख्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये प्रगत प्रक्रिया वाढणार असल्याचा विश्वास

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) रुग्णांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करीत आहे. लवकरच गोमेकॉत अत्याधुनिक मॉलिक्युलर लॅब आणि अतिरिक्त कॅथ लॅब सुरू करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ही सेवा सुरू झाल्यावर रुग्णांची निदान संख्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये प्रगत प्रक्रिया वाढणार असल्याचा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री राणे हे सतत राज्यातील जनतेच्या आरोग्याशी आपण कधीच खेळ करणार नाही आणि त्यांना हवी असलेली अत्याधुनिक सुविधा पुरविणार असल्याचे सांगत आले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी कामही सुरू केलेले आहे. आजवर ‘गोमेकॉ‘त त्यांनी अत्याधुनिक मशीन आणून रुग्णांवर होणारे उपचार कसे लवकर होतील आणि त्यांना तपासणीचा अहवाल देखील लवकर कसा मिळेल, याकडे स्वतः लक्ष पुरविले आहे.

मंत्री राणे यांनी सांगितले की, गोमेकॉत लवकरच अत्याधुनिक मॉलिक्युलर लॅब आणि अतिरिक्त कॅथ लॅब सेवा सुरू होणार आहे. या नवीन सुविधांमुळे रुग्णांवरील उपचारांचे निदान लवकर होण्यास मदत होईल. याव्यतिरिक्त हृदयविकाराच्या प्रगत प्रक्रिया करण्याच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढही होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT