Goa GMC: गोमेकॉ विभाग प्रमुख आता रडारवर; दरमहा द्यावा लागणार कामाचा अहवाल

GMC HOD: इस्पितळातील एकंदरीत स्थितीचा आढावा आता दर महिन्याला विभाग प्रमुखांना सादर करावा लागणार आहे
GMC HOD: इस्पितळातील एकंदरीत स्थितीचा आढावा आता दर महिन्याला विभाग प्रमुखांना सादर करावा लागणार आहे
GMC Dainik Gomantak
Published on
Updated on

GMC Head Of The Department

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील बाह्य रुग्ण विभाग तसेच वॉर्डमधील रुग्णांवरील सेवा तसेच शस्त्रक्रिया यासंदर्भातचा एकंदरीत स्थितीचा आढावा आता दर महिन्याला विभाग प्रमुखांना सादर करावा लागणार आहे.

यासंदर्भातचे परिपत्रक सर्व विभागांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे या इस्पितळात मिळणाऱ्या सेवा-सुविधा तसेच असलेला अभाव यांचा अंदाज व माहिती इस्पितळ व्यवस्थापनाला मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हल्लीच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या खात्यांवर तसेच इतर खात्यांवर धडक भेट देऊन आढावा घेण्यास सुरवात केल्यानंतर आरोग्यमंत्री राणे हेसुद्धा सक्रिय झाले आहेत. इस्पितळाच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेऊन रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यामागे त्यांचा प्रयत्न असतो. गोमेकॉत अपेक्षित सुधारणांच्या दृष्टीने ते नेहमीच तेथील अधिकाऱ्यांना निर्देश देत असतात.

गोमेकॉत होणाऱ्या शस्त्रक्रिया, पुढे ढकलाव्या लागलेल्या शस्त्रक्रिया, ओपीडीत तपासले जाणारे रुग्ण यांचा आढावा दर महिन्याला घेतला जाईल. यापुढे गोमेकॉत उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा पुरेपूर उपयोग योग्यप्रकारे करण्यावर भर असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अहवालात काय असेल?

ओर्थोपेडीक, ओन्कोलॉजी, मेडिसीन, रेडिओलॉजी, दंतचिकित्सा व तत्सम विभागांत कोणत्या प्राथमिक सुविधा आहेत किंवा कोणत्या सुविधांचा अभाव आहे, सर्व सुविधा या योग्य पद्धतीने वापरल्या जातात की नाही, कोणत्या सुधारणा होणे अपेक्षित आहे, विभागाच्या अडचणी आणि प्राथमिक सुविधांमधील त्रुटी व आवश्यकता यासारख्या गोष्टींचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

GMC HOD: इस्पितळातील एकंदरीत स्थितीचा आढावा आता दर महिन्याला विभाग प्रमुखांना सादर करावा लागणार आहे
शस्त्रक्रिया रखडल्या, OPD सेवेवरही परिणाम; आरोग्यमंत्री राणेंच्या आश्वासनानंतर GMC डॉक्टरांचा संप मागे

बाहेरून औषध खरेदीला बसेल आळा

अनेकदा इस्पितळात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधे तसेच लागणारी उपकरणे बाहेरून खरेदी करण्याचे प्रकार घडत आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी व अनुपलब्ध असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी विभाग प्रमुखांकडून घेण्यात येणाऱ्या अहवालाची मदत होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com