World Turtle Day 2022 Dainik Gomantak
गोवा

Turtle Nest In Goa: कासवांच्या घरट्यांजवळ बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या परप्रांतीयाविरुद्ध राणेंचे कारवाईचे निर्देश

मोरजी येथे बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी राणेंनी केली दिल्लीवासीयांवर कडक कारवाईची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: मोरजी येथील कासवांच्या घरट्यांजवळ बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या दिल्लीतील रहिवाशाविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश नगर आणि देश नियोजन (TCP) मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी वन आणि TCP अधिकाऱ्यांना दिले.

(Turtle Nest In Goa)

"अनेक तपासण्या आणि काम थांबवण्याचे आदेश असूनही, दिल्लीतील एकजण मोरजी मधील कासवांच्या घरट्याजवळ, इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये परवानगीशिवाय बेकायदेशीर बांधकाम करत आहे," असे नगर आणि देश नियोजन (TCP) मंत्री विश्वजित राणे म्हणाले. "पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रांचे उल्लंघन करणारे लोक, विशेषत: टीसीपी कायदा आणि वन कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल," असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.

ते पुढे म्हणाले, गोवा सरकार असे उल्लंघन सहन करणार नाही तसेच “वनविभागाने अधिसूचित केल्या जाणाऱ्या नो-टेक झोन आणि संवर्धन क्षेत्रांबाबत संशोधन शास्त्रज्ञ सुजीत कुमार डोंगरे यांनी तयार केलेल्या अहवालाचा वन विभाग अवलंब करेल आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करेल. कासवांच्या घरट्यांजवळील भागांवर अधिक भर दिला जाईल,” असे राणे म्हणाले. ऑलिव्ह रिडले कासवांचे नैसर्गिक प्रजनन निवासस्थान म्हणून सरकारने गोव्यातील काही समुद्रकिनारे अधिसूचित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT