Vishal Golatkar Murder Case  Dainik Gomantak
गोवा

Vishal Golatkar Murder Case: विशाल गोलतकर खून प्रकरणाशी संबंधित शस्त्रे जप्त

या खूनप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

मेरशी येथील हिस्ट्रीशिटर विशाल गोलतकर खून प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. या हल्ल्यासाठी संशयितांनी वापरलेल्या हत्यारांचा शोध जुने गोवे पोलिस घेत होते. गुन्ह्याशी संबंधित हत्यारांचा शोध घेण्यात तसेच दोन वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या खूनप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. यातील एका बाल गुन्हेगाराला ‘अपना घर’मध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच सेंट कातयान वाड्यावर विशालचा खून करुन अपघातात मृत्यू झाला असे भासवण्यासाठी संशयितांनी मेरशी येथील स्मशानभूमीजवळ झाडीत मृतदेह फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मेरशी येथील हिस्ट्रीशिटर विशाल गोलतकर याची क्रूरपणे हत्या केल्याचे शवचिकित्सा अहवालातून निष्पन्न झाले होते. त्याच्या शरीरावर 33 जखमा आढळून आल्या होत्या. त्यातील 13 जखमा भोसकल्याच्या आहेत, तर 10 जखमा जड वस्तूंनी हल्ला केल्याने झाल्या आहेत.

विशाल आणि साई ऊर्फ कोब्रा कुंडईकर या दोघांमध्ये हल्लीच मतभेद निर्माण झाले होते. विशालने केलेल्या अपमानाचा सूड उगवण्यासाठी तो संधी शोधत होता. शनिवारी रात्री विशालला साईने फोन करून, ‘हिंमत असेल तर ये’ असे आव्हान दिले.

त्यामुळे रागाच्या भरात विशाल गेला. मात्र, पूर्वतयारीनिशी सज्ज असलेल्या साईने त्याच्यावर हल्ला चढवला. मुख्य सूत्रधार साई ऊर्फ कोब्रा कुंडईकर आणि त्याचा भाऊ तुषार कुंडईकर यांनी विशालवर तीक्ष्ण हत्याराने वार केले.

तर त्यांच्यासोबत असलेल्या इतर संशयितांनी जड वस्तूंनी त्याच्या शरीरावर तसेच डोक्यावर प्रहार केले. शरीरावर अनेक ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याने आणि डोक्यावर जड वस्तूंनी केलेल्या प्रहारांमुळे विशालचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी शवचिकित्सा अहवालात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Horoscope: करिअर, प्रेमात मिळणार यश! 'या' मूलांकांच्या व्यक्तींना 'सप्टेंबर' ठरणार भाग्यशाली

Goa Rain: पावसाचे धूमशान! डिचोलीत रौद्रावतार, पोर्तुगीजकालीन पूल पाण्याखाली; पूरसदृश्य स्थिती

Ravichandran Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

Goa Live Updates: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT