Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; विरियातोंचा एल्गार, रेजिनाल्डला आव्हान

Khari Kujbuj Political Satire: महिला दिनाचे औचित्य साधत अनेक ठिकाणी आमदारांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

Sameer Panditrao

विरियातोंचा एल्गार, रेजिनाल्डला आव्हान

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस निवडून आल्यापासून प्रत्येक मतदारसंघाचा दौरा करतात, लोकांच्या समस्या जाणून घेतात. शनिवारी त्यांनी कुडतरी मतदारसंघाचा दौरा केला व त्यात त्यांनी मोठा एल्गार केला. त्यांनी सांगितले की, कुडतरी मतदारसंघ भाजपच्या तावडीतून कॉंग्रेसच्या तावडीत आणायचा आहे व तसे आवाहन त्यांनी स्थानिक नेत्यांना केले. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी कितीही आटापिटा केला तरी विद्यमान आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी या मतदारसंघावर आपली मजबूत पकड ठेवली असल्याचे जाणवते. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने काही प्रमाणात बाजी मारली. पण विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवरून लढवली जाते व त्या दृष्टीने रेजिनाल्डबाब वेगवेगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवीत आहे. मात्र, विरियातोंचे आव्हान रेजिनाल्डबाबला सुद्धा आहे. ते कसे प्रत्युत्तर देतात ते पहावे लागेल. जर कॉंग्रेस पक्षाला हा मतदारसंघ जिंकायचा असेल तर प्रथम पक्षाचे अंतर्गत मतभेद मिटविण्याचा सर्व प्रथम प्रयत्न करणे महत्वाचे नाही का? असे कॉंग्रेसवालेच म्हणताना दिसत आहेत. ∙∙∙

बावर्ची आरोलकर!

महिला दिनाचे औचित्य साधत अनेक ठिकाणी आमदारांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आमदार जीत आरोलकर यांनी महिला दिनानिमित्त दोन हजारांवर महिलांसाठी खास मेजवानी ठेवली होती. त्यांनी स्वतः मांसाहारी जेवण तयार केले होते. आरोलकरांनी जेवण तयार करण्यात ज्या पद्धतीने सहभाग नोंदविला तो पाहता निश्चित उल्लेखनीय म्हणावा लागेल. मांद्रे मतदारसंघात या जेवणावळीवरून काही दिवस चर्चाही होत राहील. मात्र, आरोलकरांनी अंगभूत गुण दाखवून दिल. आपण एक चांगले स्वयंपाकी आहोत, हेही त्यांनी दाखवून दिलेय. समाजमाध्यमांत आरोलकर शेफचे काम करीत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. पुढे-मागे आमदार राहिले न राहिले तरी त्यांना या अंगभूत गुणाचा नक्कीच लाभ होईल, हे नक्की. ∙∙∙

बाबूश यांच्या अनुपस्थितीची चर्चा

महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात हे आपल्या मतदार संघातील महालक्ष्मी, मारुतीगड, श्री वाठारेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनाला उपस्थिती लावतात. त्यांच्या मतदारसंघातील भाटलेतील सटी मंदिराच्या वर्धापन दिनांच्या कार्यक्रमास मात्र ते उपस्थित राहत नाहीत. शुक्रवारी सायंकाळी मात्र मुख्यमंत्र्यांनी देवीच्या दर्शनाला हजेरी लावली. कदाचित मंदिर व्यवस्थापनाला मुख्यमंत्र्यांसमवेत आमदार बाबूश येतील असे वाटत होते. मात्र, त्यांचे काही दर्शन झाले नाही. परंतु सर्व मंदिर व्यवस्थापन वर्धापन दिनांचे निमंत्रण आमदार म्हणून बाबूश यांना देतात. त्यातही फार विचार करूनच ते कोणत्या कार्यक्रमाला जायचे ते ठरवतात. गेल्यावर्षी शहरातील साई मंदिराच्या कार्यक्रमाला नगरसेवकाला आमदार येतील असे वाटले होते, पण त्या नगरसेवकाचा अपेक्षाभंग झाल्याची चर्चा त्या परिसरात बरीच दिवस सुरू होती. ∙∙∙

आयकर छापा अन् चुकीचे पत्ते?

अलीकडेच आयकर अधिकारी पथकाच्या कटू अनुभवाचा सामना म्हापसा पोलिस हद्दीतील काही कुटुंबांना करावा लागला. मात्र, पोलिस चौकशीतून सदर छापा टाकण्यासाठी आलेले हे खरोखर आयकर पथकच असल्याचे उघड झाले. मात्र, या

पथकाच्या सत्यतेवर लोकांनी संशय व्यक्त केला. गृहनिर्माण वसाहत तसेच म्हापसा शहरतील चार ठिकाणी नॉयडास्थित आयकर अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. नंतर ही चारही ठिकाणी चुकीच्या पत्यावर गैरसमजूतीतून छापेमारीचा प्रकार घडल्याचे मान्य करीत सदर आयकर पथक माघारी परतले. याप्रकरणी एका कुटुंबाने म्हापसा पोलिसांत लिखित तक्रार दिली. या तक्रारीनुसार, दोन तासांच्या छाप्याच्या प्रकारावेळी पथकाने आम्हाला वेठीस धरले. आलेल्या अधिकाऱ्यांसोबत महिला कर्मचारी नसल्याने त्यांनी चीड व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांनी आमचे मोबाईल काढून घेतले तसेच ज्या व्यक्तीचा अधिकारी शोध घेत होते, ती व्यक्ती

इथे राहतच नव्हती! म्हापसा पोलिसांना असे एकूण चार कॉल आले होते, व तिथे आयकर पथक चुकीच्या ठिकाणीच आल्याचे समजले, हे तितकेच विशेष! ∙∙∙

महिला दिन झाला; हक्काचे काय?

देशात तसेच राज्यात महिलादिन मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला. प्रत्येक मतदारसंघातील आमदार व मंत्र्यांनी हा दिन महिलांच्या मोठ्या संख्येने आयोजित केला. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लाभावी यासाठी एखाद्या नामांकित व्यक्ती किंवा अभिनेत्रीला पाचारण करण्यात आले. त्यामुळे महिलांची उपस्थितीही चांगली लावली. प्रत्येक आमदार व मंत्र्यांमध्ये महिला दिन कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थितीची छायाचित्रे काढून आपले असलेले वजन व वर्चस्व हेच दाखवण्याचा प्रयत्न झाला. कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो आमदार व मंत्री उपस्‍थितांमध्ये उभे राहून छायाचित्रे काढतात. अशी छायाचित्रे काढून या लोकप्रतिनिधींना लोकांची मने जिंकायची तसेच आपल्या वरिष्ठ पक्षनेत्यांना आपले मतदारसंघात असलेले वजन याकडे लक्ष वेधायचे असते. कधी नव्हे तो यावर्षी महिला दिन भाजप सरकारच्या काळात राज्याच्या विविध भागात कार्यक्रम आयोजित करून यशस्वीपणे साजरा केला गेला. मात्र, महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याबाबत हे राजकारणी अजूनही गंभीरपणे लक्ष देताना दिसत नाहीत. महिलांना हा हक्क कधी मिळणार? ∙∙∙

शिमगोत्सव करा, पण कोंडी नको!

पणजीत सध्या ‘स्मार्ट सिटी’चे काम सुरू आहे. पण खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ कोण, हे विचारले तर रस्त्यावर अडकलेले नागरिक एकमेकांकडेच पाहतात. कार्निव्हलच्या वेळीच सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. आता शिमगोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे, तर यावेळीही ‘कोंडी विशेष’ अनुभवायला मिळणार का, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. आम्हाला शिगमोत्सव आवडतो, पण गाड्यांची रांग नको, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आम्ही शिगमोत्सवाचे स्वागत करू, पण आमच्या गाड्या त्या उत्सवाच्या रांगेत अडकणार नाहीत याची काळजी घ्या, असे लोक बोलतात. तर एकंदरीत, शिमगोत्सवात मज्जा करायचीच आहे, पण गाड्यांच्या ‘लांबच लांब लागणाऱ्या’ रांगा नकोत, अशी लोकांची मनापासून अपेक्षा आहे. ∙∙∙

‘ड्रग्ज’अन् लपवाछपवी!

राज्यातील ड्रग्ज व्यवहाराचे मूळ उच्चाटन करण्याचा विडा पोलिसांनी उचलला आहे, असे सध्याच्या पोलिस कारवाईवरून दिसते. मोठ्या प्रमाणात सिंथेटीक ड्रग्ज व्यवहार होत असला तरी पोलिसांना फक्त गांजाच सापडतो. क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी शिताफीने राज्यात क्वचितच सापडणारा हायड्रोपोनिक नावाचा ड्रग्ज जप्त केला. ज्याच्याकडे तो सापडला त्याची माहिती देण्याबाबत पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी गुप्तता बाळगली. मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास पोलिसांचीच नाचक्की होते, यामुळे ते दचकतात. त्यांनी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊ नका, असे फर्मानही सोडले. त्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांतही नाराजी आहे. अधीक्षक राहुल गुप्ता हे क्राईम ब्रँच अधीक्षक आहेत तसेच त्यांच्याकडे पोलिस जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणूनही ताबा आहे. मात्र, ते ‘पीआरओ’सारखे वागत नाहीत. त्यांनी क्राईम ब्रँचचा ताबा स्वीकारल्यापासून अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत त्यामध्ये ‘सुलेमान पलायन’ या प्रकरणाला विभागाचे प्रमुख हे जबाबदार होते. मात्र, पोलिस प्रमुखांनी त्यांना पाठीशी घातले. सायबर क्राईम गुन्हे जनजागृतीत अधिक गुंतले आहेत. प्रसिद्धीसाठी आसुसलेले अधिकारी म्हणून त्यांची पोलिस वर्तुळात चर्चा आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT