Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

Loliem Filmcity: लोलयेत फिल्म सिटी नको! खासदार विरियातोंची मागणी; पर्यावरण, सुरक्षा महत्त्‍वपूर्ण असल्याचा केला दावा

Goa Filmcity: पठारे ही पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची केंद्रे आहेत. त्यांचेच जर काँक्रीटीकरण झाले तर पाण्‍याची गंभीर समस्‍या निर्माण होऊ शकते, असा दावा खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.

Sameer Panditrao

काणकोण: लोलये पठारावर होऊ घातलेल्या फिल्म सिटीला पर्यावरण व सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने विरोध करण्‍यात येत आहे. या प्रकल्‍पाची जागा कारवार येथील नौदल व कैगा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ आहे. फिल्म सिटीत पाकिस्तानी किंवा शत्रू राष्‍ट्रांचे हेर घुसून नौदलाची इंत्‍यभूत माहिती चोरण्‍याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

शिवाय पठारे ही पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची केंद्रे आहेत. त्यांचेच जर काँक्रीटीकरण झाले तर पाण्‍याची गंभीर समस्‍या निर्माण होऊ शकते, असा दावा दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला.

आज मंगळवारी काणकोणचा दौरा करताना विरियातो फर्नांडिस यांनी विविध पंचायती व पालिका क्षेत्रातील लोकांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. तसेच आगोंद ते लोलये, श्रीस्थळ ते खोतीगाव व काणकोण पालिका क्षेत्रात बैठका घेतल्या. कोणताही भेदभाव न करता नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

काँग्रेसचे गास्पर कुतिन्हो यांनी पाटोळे व अन्य किनारी भागात रेंदेर व्यवसायाबाबत कैफियत मांडली. तसेच पाळोळे येथे खासदार निधीतून सामाजिक सभागृह उभारण्याची मागणी केली. त्‍यावर, जागा उलब्‍ध करून देण्‍याची सूचना विरियातो यांनी केली. नगरसेवक सायमन रिबेलो यांनी मुंडकारांच्‍या घरांचे नूतनीकरण करण्यासाठी परवानगी देण्याचा कायदा संसदेत करण्याची मागणी केली.

कॅ. विरियातो फर्नांडिस, खासदार (दक्षिण गोवा)

काणकोणात वीजपुरवठा खंडित होण्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत. या समस्‍येवर दूरदृष्टीने उपाययोजना करणे शक्य आहे. काणकोणपासून कैगा अणुऊर्जा प्रकल्प काही किलोमीटर अंतरावर आहे. या प्रकल्पातून दक्षिण गोव्याला निरंतर वीजपुरवठा होणे शक्य आहे. त्यासाठी राज्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

Goa Crime: मुंगूल-मडगावातील गँगवॉरचा गोव्यातील अंडरवल्डशी संबंध; वॉल्टर गँगने 2 वर्षापूर्वीच्या मारहाणीचा घेतला बदला

Poco M7 Plus धमाका! खास मोबाईलप्रेमींसाठी पोकोने लॉन्च केला धमाकेदार स्मार्टफोन, Vivo आणि Realme चं वाढलं टेन्शन; जाणून घ्या अफलातून फीचर्स

Nitin Raiker: अभिमानास्पद! अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांना भारत सरकारचा 'ब्रॉन्झ डिस्क मेडल' पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT