Filmcity In Goa: 'गोव्यात फिल्मसिटी व्हावी ही मनोहर पर्रीकरांची इच्छा, 5,000 रोजगार संधी' - फळदेसाई

एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या मार्फत राज्यात फिल्मसिटी उभारली जाणार आहे.
Minister Subhash Phaldesai
Minister Subhash PhaldesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Filmcity In Goa: गोव्यात चित्रपट आणि मनोरंजन उद्योगासाठी पायाभूत सुविधा असलेली फिल्मसिटी उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) च्या मार्फत राज्यात फिल्मसिटी उभारली जाणार आहे.

'फिल्मसिटीसाठी काणकोणमध्ये जागा निश्चित करण्यात आली असून, यातून सुमारे पाच हजार रोजगार निर्मिती होईल,' अशी माहिती समाज कल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

'गोव्यात फिल्मसिटी व्हावी अशी दिवगंत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची इच्छा होती. फिल्मसिटीसाठी काणकोणमधील भगवती पठारावर दहा लाख चौ. मीटर जागा निश्चित करण्यात आली आहे. यातून सुमारे पाच हजार रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे,' अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली आहे.

काणकोण, लोलये पंचायत क्षेत्रात भगवती पठारावरील नियोजित फिल्मसिटी प्रकल्पात पाच हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

दरम्यान, यापूर्वी लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेच्या खास आमसभेत फिल्मसिटीसाठी जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

NEET Exam
Goa Mega Job Fair 2026
Goa Harit Goa sapling Plantation
CM Pramod sawant sanad distribution margao
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com