Rahul Gandhi
Rahul Gandhi  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राहुल गांधी तुम्हीच सांगा! विरियातोच्या संविधानाबाबत वक्तव्यवरुन विनोद तावडेंची मागणी

Pramod Yadav

Goa Politics

गोमन्तकीयांवर संविधान लादण्यात आल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केले. यावरुन विरियातोंसह काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मुख्यमंत्री सावंत यांच्यासह पंतप्रधान मोदी यांनी देखील विरियातो यांच्या वक्तव्याचा निषेध करत, काँग्रेच्या भूमिकेवर सडकून टीका केली. दरम्यान, याबाबत आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी याबाबत राहुल गांधीकडे स्पष्टीकरणाची मागणी केलीय.

विरियातो फर्नांडिस यांनी दुहेरी नागरिकत्वासाठी संविधानात बदल करण्याचे वक्तव्य केले आहे. याबाबत आता खासदार राहुल गांधी यांनीच वक्तव्य करावे, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली आहे.

गोव्यावर संविधान लादण्यात आल्याचे वक्तव्य विरियातो यांनी दक्षिण गोव्यातील एका कोपरा सभेत केले होते. २०१९ साली दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा राहुल गांधी यांना समजावून सांगतानाचा किस्सा विरियातो यांनी विशद केला होता.

दुहेरी नागरिकत्वाची मागणी असंविधानिक असल्याचे गांधी यांना सांगितले पण, गोमन्तकीयांवर संविधान लादण्यात आले विरियातो म्हणाल्याचा उल्लेख त्यांनी भाषणात केला होता.

संविधान १९५० साली भारताने मान्य केले मात्र, गोवा १९६१ साली मुक्त झाला. संविधान लागू झाले त्यावेळी गोव्याचा त्यात समावेश नव्हता, असे स्पष्टीकरण देखील विरियातो यांनी दिले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावरून राज्य आणि देश पातळीवर मोठा वादंग पाहायला मिळाला.

दरम्यान. संविधान लादलं असे मी म्हणालो नाही तर गोयंकारपणाच्या संरक्षणाबाबत मी भाष्य केले असे, विरियातो यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: गोव्याला अवकाळीचा फटका; 15 दिवसांत पडझडीचे 130 कॉल्स, 34 लाखांचे नुकसान

Women In Goa Startup: देशापेक्षा गोव्याची सरासरी अधिक; स्टार्टअपमध्ये महिलांचा डंका

Goa News : ‘आमुरचंवर’ लेखसंग्रह ठरेल भावी पिढीसाठी मार्गदर्शक: मिनाक्षी मार्टिन्स

मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये! 15 दिवसांत 18 लाख सिम कार्ड बंद होणार; जाणून घ्या नेमकं कारण?

Chhattisgarh Accident: मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, पिकअपखाली चिरडून 18 मजुरांचा मृत्यू; 20 हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT