Zuarinagar Ammonia Issue Dainik Gomantak
गोवा

Viral Video: 10 वर्षात त्यांना कॅन्सर होऊ शकतो पण, सरकारला फक्त वाहनांचा धोका मोठा वाटतोय; झुआरीनगरातील अमोनिया समस्येवरुन तरुण संतापला

Zuarinagar Vasco Viral Video: वास्को येथील झुआरीनगर औद्योगिक परिसरातील अमोनियाचा वाढता प्रभाव आणि दुर्गंध स्थानिक नागरिकांसाठी एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे

Akshata Chhatre

वास्को: झुआरीनगर औद्योगिक परिसरातील अमोनियाचा वाढता प्रभाव आणि दुर्गंध स्थानिक नागरिकांसाठी एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असून, यावर प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. याच समस्येवर भाष्य करणारा आणि सरकारला थेट प्रश्न विचारणारा एका तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तो हजारो लोकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तो तरुण म्हणतो की, या भागात कुठेही गेलं तरी अमोनियाचा दुर्गंध काही पाठ सोडत नाही. घरातही या वासाचा त्रास होतो. "एका जुनाट गाडीमुळे होणारे प्रदूषण किंवा एखादा माणूस ड्रग्ज घेऊन स्वतःच्या जीवाला धोका पोहोचवतो, याउलट हजारो लोकांच्या आयुष्याशी खेळणारी ही गोष्ट एवढी सोपी आहे का?" असा संतप्त सवाल त्याने विचारला आहे.

त्याने सरकारवर दुहेरी धोरण असल्याचा आरोप केला आहे. तो म्हणतो की, "जर १० किंवा १२ वर्षांची जुनी गाडी रस्त्यावर चालवणे धोकादायक ठरू शकते, तर वर्षानुवर्षे अमोनियाचा वास आणि त्याचा वाढता प्रभाव याचा विचार का केला जात नाहीये?" ड्रग्ज घेणारा माणूस फक्त स्वतःच्या जीवाला इजा पोहोचवतो, पण इथे सुरू असलेल्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्य जीवाला हानी पोहोचत आहे, याकडे त्याने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

या सततच्या प्रदूषणामुळे लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ एका व्यक्तीचा संताप नाही, तर वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या हजारो नागरिकांचा संताप समोर आला आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून त्वरित ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

Goa POCSO Case: 10 वर्षांची सक्तमजुरी, दंड अन् आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान, लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितेसह सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT