पणजी: राज्यातील निवडणूक (Goa Election 2022) प्रचार संपताच काँग्रेसच्या तीन व तृणमूल काँग्रेसच्या एक मिळून चार उमेदवारांची एका हिंदी चित्रवाहिनीने कथित स्टिंग ऑपरेशनद्वारे व्हायरल केलेल्या व्हिडिओची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ज्या ‘यू ट्यूब’वरून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्याची माहिती घेण्यासाठी ती सीआयडी सायबर कक्षाकडे (Cyber Cell) देण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षकाने दिली.
12 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपल्यानंतर एका हिंदी चित्रवाहिनीने काँग्रेस व तृणमूलच्या उमेदवारांनी निवडणूक जिंकल्यानंतर भाजपमध्ये जाण्याची दर्शविली असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. याप्रकरणी काँग्रेसने आक्षेप घेऊन तक्रार दाखल केली होती.
जबानी महत्त्वाची
सध्या या चित्रवाहिनीचा पत्ता मिळवण्यासाठी संबंधित राज्यातील पोलिसांशी संपर्क साधला जाणार आहे. ज्यांच्याविरुद्ध हा व्हिडिओ काढून व्हायरल करण्यात आला आहे, त्या काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांनी तो बनावट व हेराफेरी केलेला असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे संपादकाच्या जबानीनंतरच सविस्तर माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.