Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: 56व्या 'IFFI'मध्ये 'पुष्पा'ची क्रेझ! 'मै झुकुंगा नहीं साला' म्हणत एन्ट्री, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

IFFI Goa: गोव्यात सध्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) धामधूम सुरू असून देश-विदेशातील अनेक नामांकित कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Sameer Amunekar

गोव्यात सध्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) धामधूम सुरू असून देश-विदेशातील अनेक नामांकित कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लाल गालिचावरून ते विविध चित्रपटांच्या प्रीमियरपर्यंत, संपूर्ण गोवा चित्रपटसृष्टीच्या झगमगाटात न्हालेला दिसत आहे. या उत्सवामुळे गोव्याच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे.

दरम्यान, ‘दैनिक गोमंतक’ टीव्हीनं सादर केलेल्या एका विशेष संकल्पनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून तो चर्चेचा विषय ठरत आहे.  या व्हिडिओमध्ये सदर तरुण ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या लोकप्रिय अवतारात दिसून येत असून त्याने साकारलेली शैली पाहून अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. या युवकाने पुष्पाच्या कॅरेक्टरप्रमाणे खास अंदाज, संवाद फेकण्याची पद्धत आणि चालण्याची स्टाईल अचूकपणे सादर केली आहे.

हा तरुण आपल्या अनोख्या सादरीकरणामुळे महोत्सवात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पुष्पा स्टाईल पोशाख, दाढीचा लुक आणि प्रसिद्ध डायलॉगची नक्कल करत तो महोत्सवाच्या परिसरात सर्वांचे मनोरंजन करताना दिसत आहे. उपस्थितांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक करत सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

IFFI च्या वर्तुळात हा अनोखा प्रकार चर्चेचा विषय ठरला असून महोत्सवाच्या रंगतदार वातावरणात भर घालणारा हा क्षण प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा ठरत आहे.

एकीकडे दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन तर दुसरीकडे अशा अनपेक्षित मनोरंजनामुळे ५६ वा इफ्फी महोत्सव अधिकच गाजत असल्याचे चित्र दिसत आहे. कला, सिनेमा आणि लोकसहभाग यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असल्याने हा महोत्सव यंदा विशेष संस्मरणीय ठरत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT