Goa Lok Sabha Election 2024: Goa Congress Complaint Against PM Modi And CM Sawant Based Over Code Of Conduct Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2024: PM मोदी, CM सावंत यांच्यावर कारवाई करा; गोवा काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे का केलीय तक्रार?

Goa Lok Sabha Election 2024 News in Marathi: भाजपच्या सदस्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

Pramod Yadav

गोवा काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह आठ जणांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी याप्रकरणी तक्रार मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांच्याकडे तक्रार दाखल करत, कारवाईची मागणी केलीय. भाजपच्या सदस्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

विरियातो फर्नांडिस काँग्रेसचे दक्षिण गोवा उमेदवार आहेत. पण, भारतीय जनता पक्षाचे काही सदस्य विरियातो यांच्या भाषणाचा विपर्यास करुन, भाषणातील काही शब्द फिरवून त्यांची संविधानाचा अनादर केल्याचा तसेच, त्यांना संविधानाप्रती आदर नसल्याची माहिती पसरवत आहेत.

विरियातो कारगिल युद्धात सहभाग असलेले सैनिक असून, त्यांना संविधानाबाबत आदर आहे. दुहेरी नागरिकत्वाबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करुन चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पाटकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार माविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर, आमदार दिगंबर कामत, सरचिटणीस दामू नाईक यांच्या नावाचा समावेश आहे.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड येथील भाषणाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. PM मोदी, CM सावंत यांच्यासह नमूद भाजप सदस्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून, त्यांच्याविरोधात योग्य कारवाई करावी, अशी मागणी पाटकर यांनी या तक्रारीद्वारे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT