Vinayak Damodar Savarkar Dainik Gomantak
गोवा

Vinayak Damodar Savarkar: सावरकरांचे ‘गोमांतक’ महाकाव्य कोकणीत; 7 डिसेंबरला प्रकाशन सोहळा

डॉ. भूषण भावे यांनी केले गद्य रुपांतरण

दैनिक गोमन्तक

Vinayak Damodar Savarkar Mahakavya in Konkani Language

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ''गोमांतक'' या महाकव्याच्या कोंकणी गद्य रुपांतरणचे प्रकाशन गुरुवार ७ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता पाटो, पणजी येथील कला व संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ॲड. नरेंद्र सावरकर यांचीही उपस्थिती असेल.

या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील प्रगतीपथ एज्युकेशनल फाउंडेशन या नामांकित संस्थेने केले आहे. ही संस्था मिलेनियम स्कूल या नावे पुण्यात हजारो विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यात अग्रेसर आहे. या संस्थेचे विश्वस्त अन्वित फाटक या कार्यक्रमाला खास निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गोमांतक काव्याची पृष्ठभूमी पोर्तुगीज राजवटीच्या काळाची असून त्यात पोर्तुगीज धर्मांध सत्तेने हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार व हिंदूंनी त्याविरुद्ध दिलेला चिवट लढा यांचे वर्णन केले आहे. हे महाकाव्य १७३० नंतरच्या गोमंतकाच्या इतिहासावर आधारित आहे.

हाती कागद व पेनही नसताना...

अंदमानच्या काळाकुट्ट कोठडीत प्रदीर्घ तुरुंगवास भोगत असताना व हाती कागद व पेनही नसताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दोन महत्त्वाच्या (कमला आणि गोमांतक) या काव्यांची निर्मिती केली.

दिवसभर काथ्या कुटणे व तेलाचे घाणे ओढणे यांसारखी कष्टांची कामे करून रात्री अंधार कोठडीत परतल्यानंतर मनाचा कठोर निग्रह, प्रखर राष्ट्रप्रेम व कुशाग्र प्रतिभाशक्ती यांच्या आधारे सावरकरांनी वृत्त छंदात काव्याच्या पंक्ती रचल्या, कोळशाने कारावासाच्या भिंतीवर अंधूक उजेडात त्या लिहून काढल्या, मुखोद्गत केल्या, वॉर्डर येण्यापूर्वी त्या पुसून टाकल्या...

ही प्रक्रिया सतत अकरा वर्षे केल्यानंतर पुढे अंदमानातून सुटका झाल्यावर रत्नागिरी येथे स्थानबद्धतेच्या काळात, जिथे त्यांना पेन व कागद मिळाला तेथे त्यांनी या काव्यकृती लेखनबद्ध केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'जीवन गेला तरी चालेल, पण रील बनलीच पाहिजे', जोडप्याने कालव्यात घेतली उडी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

AI Market: अमेरिकेला मागे टाकून भारत बनणार AI ची सर्वात मोठी बाजारपेठ; चॅटजीपीटीच्या CEO चं मोठं वक्तव्य

Train Robbery: कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई! प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू लाटणारा सराईत चोरटा जेरबंद; 12.57 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Assembly Session: मर्दनगडावर उभारण्यात येणार संभाजी महाराजांचे स्मारक, गडाच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा; सरकारने दिले ठोस आश्वासन

Priyansh Arya Century: 7 चौकार, 9 षटकार! श्रेयस अय्यरच्या जोडीदाराचा धमाका, प्रियांश आर्याने ठोकले धमाकेदार शतक; नावावर केला नवा रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT