Premanand Naik Protest Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: ‘भूतानी’ विरुद्ध एकवटले शेकडो ग्रामस्‍थ! बनावट व्‍हिडिओवरून गुन्हा नोंद करण्‍याची मागणी

Bhutani Infra Project Sancoale: ‘सांकवाळ अगेन्‍स्‍ट मेगा प्रोजेक्‍ट’ या बॅनरखाली ग्रामस्‍थ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. त्‍यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. प्रेमानंद नाईक यांनी भूतानी प्रकल्पाविरोधात सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज सातवा दिवस होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Premanand Naiks Protest Against Bhutani Infra Project Sancoale

वास्को: सांकवाळ येथील ‘भूतानी’ प्रकल्‍पाविरोधात गेल्‍या सात दिवसांपासून बेमुदत उपोषणास बसलेले माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांच्यावर विनाकारण आरोप करून त्यांची बदनामी करू नये. तसेच या प्रकल्पाला दिलेला बांधकाम परवाना ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी आज रविवारी शेकडो ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्र जमून केली. तसेच नाईक यांच्‍या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. त्‍यांची प्रकृती खालावत चालली आहे. यावेळी ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती.

‘सांकवाळ अगेन्‍स्‍ट मेगा प्रोजेक्‍ट’ या बॅनरखाली ग्रामस्‍थ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले. त्‍यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. प्रेमानंद नाईक यांनी भूतानी प्रकल्पाविरोधात सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज सातवा दिवस होता.

प्रेमानंद नाईक यांच्या बिघडणाऱ्या तब्येतीबद्दल सांकवाळचे पंचसदस्य तुळशीदास नाईक यांनी चिंता व्यक्त केली. तसेच भूतानी प्रकल्‍पाचे परवाने तात्‍काळ रद्द करण्याची मागणी केली. नाईक यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्‍यामुळे सरकारने आता या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

गोवा फॉरवर्डचे मोहनदास लोलयेकर यांनी नाईक यांच्‍या आंदोलनास समस्‍त गोमंतकीयांनी पाठिंबा देण्‍याचे आवाहन केले. आमचा पक्ष हा प्रकल्प रद्द करण्यासाठी एकत्रितपणे लढेल, असेही त्‍यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्‍हो, पर्यावरणप्रेमी ओलेन्‍सिओ सिमॉईस, अरुणा वाघ यांच्‍यासारख्या इतर प्रमुख व्यक्तींनी देखील या आंदोलनात सहभागी होत एकात्मतेचा संदेश दिला.

दरम्यान, सायंकाळच्या सभेला शेकडो लोक उपस्थित होते. उपोषणाला पाठिंबा देताना पंच तुळशीदास नाईक, मॉरिलिओ कार्व्हालो आदींची यांची भाषणे झाले. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रेमानंद नाईक यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले.फसवणुकीचा आरोप

माजी सरपंच नारायण नाईक, पंच रॉकी वालिस आणि सुनील गावस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रेमानंद नाईक हे सांकवाळवासीयांची तसेच गोमंतकीयांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. नाईक हे उपोषणादरम्यान लपून खाद्यपदार्थ खातात तसेच मद्यपान करतात, असाही आरोप करून एक व्हिडिओ प्रसारमाध्यमांना दाखविला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी आणि प्रेमानंद नाईक यांच्याविरोधात कारवाई करावी अशीही मागणी केली. त्‍यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

उपोषणाविरोधातील व्‍हिडिओ बनावट

भूतानी प्रकल्पाविरोधात माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांच्‍या उपोषणाविरोधात माजी पंचसदस्य रॉकी वॉलीस, नारायण नाईक व सुनील गावस यांनी पत्रकार परिषद घेऊन जो काही व्हिडिओ दाखविला आहे, तो बनावट आहे. तसेच या लोकांनी महिलांच्‍या शौचालयात कॅमेरा लावून मोठा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्‍यांना दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ताबडतोब अटक करावी, अशी मागणी करत प्रतिमा कुतिन्हो यांनी केली. तसेच संध्‍याकाळी वेर्णा पोलिसांत तक्रार दाखल केली. येथील आझाद मैदानावर रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुतिन्हो बोलत होत्‍या. यावेळी काही सामाजिक कार्यकर्तेही उपस्‍थित होते.

महिलांच्‍या शौचालयात कॅमेरा आलाच कसा?

उपोषण सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शौचालयाचा मीसुद्धा वापर केला. तेथे दोन शौचालये आहेत. महिलांनी वापर केलेल्या शौचालयात कॅमेरा कसा आला? हा एक मोठा गुन्हा आहे. स्मृती इराणींविषयी कळंगुट येथे घडलेल्या प्रकाराची आठवण करून देत कुतिन्हो यांनी तिघांवरही गुन्हा नोंद करण्‍याची मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT