Sancoale Goa  Dainik Gomantak
गोवा

सांकवाळच्या संरक्षित स्थळावर विजयदुर्गा देवीची स्थापना; बेपत्ता 8 जणांविरोधात 'लुक आऊट' नोटिस जारी

गेल्या सत्तरा-अठरा ऑगस्टला आठ व्यक्तींनी एकत्र येऊन मध्यरात्री विजयदुर्गा देवीची संरक्षित जागेवर स्थापना केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Sancoale Goa : सांकवाळ येथील संरक्षित स्थळावर विजयदुर्गा देवीची स्थापना करून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ज्या आठ व्यक्तिंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्यापासून बेपत्ता असल्याने त्यांच्याविरोधात ‘लुक आऊट’ नोटिस जारी करण्यात आली आहे.

गेल्या सत्तरा-अठरा ऑगस्टला आठ व्यक्तींनी एकत्र येऊन मध्यरात्री विजयदुर्गा देवीची संरक्षित जागेवर स्थापना केली होती. सदर माहिती मिळाल्यावर सांकवाळ परिसरातील एका चर्चचे फादर व काही ख्रिश्चन धर्मीय रात्रीच्या वेळी एकत्र आले होते. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी समजूत काढल्यावर परिस्थिती निवळली होती. त्यानंतर स्थानिक रहिवाशी कालीदास वायंगणकर, करणी सेनेचे संतोषसिंह राजपूत यांच्यासह आठजणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वायंगणकर, राजपूत वगळता इतर अज्ञात असल्याने त्यांचा शोध पोलीस घेत होते. परंतु त्यांच्या नावाचा अथवा गावाचा अद्याप पत्ता मिळालेला नाही. तसेच त्यापैकी कोणीही हाती लागले नाही. वायंगणकर, राजपूत यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी या अर्जाला विरोध केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT