Vijay Sardesai in Goa Assembly Session slams vishwajit rane Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय कोमात, ते कधीही मरू शकते! विजय सरदेसाईंचा विधानसभेत हल्लाबोल

विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील सुविधांच्या कमतरतेवर विधानसभेचे लक्ष वेधून घेतले.

Kavya Powar

Vijay Sardesai Slams Vishwajit Rane: गोव्यात सध्या आठव्या विधानसभेचे चौथे अधिवेशन सुरू आहे. आज (29) अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. नेहमीप्रमाणे आजही विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत होते. यावेळी गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील सुविधांच्या कमतरतेवर विधानसभेचे लक्ष वेधून घेतले.

विजय सरदेसाई म्हणाले की, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील अनेक सुविधा नसल्याने सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वैदयकीय उपचारासाठी रुग्णालयात गेल्यावर तिथले डॉक्टर रुग्णांना GMC मध्ये जायला सांगतात. जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन, एमआरआई अशा अनेक सुविधा नाहीत. आयसीयू युनिट म्हणावे तसे कार्यान्वित नाही. तसेच रुग्णालयात अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांची कमी आहे.

याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेला एकजण उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेला असता त्याला फक्त गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. त्यानंतर तो खाजगी रुग्णालयात गेल्यावर कळले की त्याला स्लिप डिस्कचा त्रास आहे. यातूनच जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार तपासणी उघड होते.

रुग्णालयात सुविधांसाठी एक वर्षापासून प्रपोजल तसेच...

ते पुढे म्हणाले की, इथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी कँटिनची सुविधा सुद्धा रुग्णालयात नाही. म्हणावी तशी डेन्टल सुविधा आणि अनेक गोष्टी इथे नाहीत. उपचारासाठी येणाऱ्या लोकांना नेहमी GMC मध्ये पाठवण्यात येथे. मग या जिल्हा रुग्णालायचा काय उपयोग?

2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यन्त 3612 जणांना जिल्हा रुग्णालयातून GMC मध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच रुग्णांना तपासण्यासाठी फक्त 1 वाजेपर्यंतच डॉक्टर उपलब्ध असतात, इथे 24 तास फार्मसीची सुविधा देखील नाही. या सगळ्यामध्ये सामान्य लोकांचे मात्र हाल होतात. दक्षिण गोव्याचे जिल्हा रुग्णालय हे कोमात आहे, ते कधीही मरु शकते अशी त्याची सध्याची स्थिती आहे.

विश्वजित राणेंचा पलटवार...

विजय सरदेसाईंंनी दक्षिण जिल्हा रुग्णालयाची स्थिती सांगितल्यावर विश्वजित राणेंनी पलटवार करत सरकार आणि आरोग्य विभागाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात काही सुविधांचा अभाव आहे याची मला जाणीव असली तरी आमचे प्रयत्न कुठेच थांबले नाहीत. जास्तीत-जास्त चांगल्या सुविधा इथे आणण्यासाठी आरोग्य विभाग तत्पर आहे.

अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर भरण्यासाठी आम्ही जाहिराती देण्याचे काम करत आहोतच, कुणालाही एक-दीड लाख पगारचे आमिष देऊन आम्ही त्यांना इथे आणू शकत नाहीत. त्यासाठी खरंच डॉक्टर उपलब्ध असले पाहिजेत. आम्ही गोव्यातील डॉक्टर घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

ते पुढे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात जरी काही गोष्टींचा अभाव असला तरी तुम्ही बाहेरच्या राज्यात जाऊन बघा, असे जिल्हा रुग्णालय तुम्हाला कुठे दिसणार नाही.

विजय सरदेसाईंंनी मांडलेल्या मुद्यांवर आरोग्य विभाग नक्की काम करेल असे विश्वजित राणेंनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT