Valpoi News : केरीत हँडलूमद्वारे महिला आत्मनिर्भर

‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ : स्वयंरोजगाराकडे वाटचाल; उत्स्फूर्त प्रतिसाद
Valpoi Handloom Training Centre
Valpoi Handloom Training CentreGomantak Digital Team
Published on
Updated on

सपना सामंत

Valpoi News : ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या हस्तकला, कापड आणि काॅयर संचालनालयातर्फे केरी-सत्तरी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॅंडलूम प्रशिक्षण केंद्राला ग्रामीण भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

हस्तकला कारागीर या स्वावलंबी योजनेचा लाभ घेत आहेत. प्रशिक्षण केंद्रातून कुणबी साड्या, टाॅवेल, उपकरणे तसेच योगा मॅट बनविण्याचे महिलांना प्रशिक्षण दिले जाते. यासाठी लागणारे सूत (लुम्स) तसेच तर आवश्यक साहित्य आणि पूर्ण प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जात आहे. सुती साड्या, कपडे बनविण्याच्या हातमाग यंत्रणेद्वारे केरी-सत्तरीतील महिलांना आत्मनिर्भर बनवून स्वयंरोजगाराकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

Valpoi Handloom Training Centre
National Handloom Day 2022 : 'हातमाग' हा भारताचा वारसा; जाणून घ्या कशी झाली राष्ट्रीय हातमाग दिवसाची सुरुवात

एक महिन्याच्या कालावधीत सुरवातीला ६० महिला या प्रशिक्षण वर्गात सहभागी झाल्या होत्या. मात्र, आता दिवसेंदिवस महिलांची संख्या वाढत आहे. ६०वरून आता १०० च्या वर महिलांचा सहभाग झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे प्रशिक्षण घेऊन यातून महिलांना रोजगार प्राप्त होणार आहे. हे प्रशिक्षण केरी-सत्तरी येथील बाल भवन केंद्रावर दिले जात आहे.

Valpoi Handloom Training Centre
Valpoi News: वाळपई येथे गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप

केरी-सत्तरी येथील प्रशिक्षण केंद्रात महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या चार शिक्षण तुकड्या केल्या आहे. मुळगाव येथील सोनिया कोरगावकर, मनित शिरोडकर आणि थिवी येथील किशोरी गावडेकर या महिलांना प्रशिक्षण देत आहेत. मशीन दुरुस्तीचे प्रशिक्षणही पुंडलिक म्हापसेकर देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com