Vijay Sardesai News  Dainik Gomantak
गोवा

‘दिल्ली’च्या आदेशानुसार सरकारचा ‘कारभार’

विजय सरदेसाई यांचा निशाणा; सप्तकोटेश्वर मंदिराच्या कामाबाबतही नाराजी

दैनिक गोमन्तक

डिचोली : राज्यातील भाजप सरकार झोपलेले आहे. या सरकारला राज्याचे काहीच पडलेले नाही. हे सरकार केंद्राच्या आदेशानुसार चालत आहे, अशी टीका गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. डिचोलीतील एका कार्यक्रमात त्यांना सरकारवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली.

नार्वे येथील ऐतिहासिक श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या कामाची पाहणी केल्यानंतर सरदेसाई पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी विजय सरदेसाई यांनी देवाचे आशीर्वाद घेतले. मंदिर कामाच्या पाहणीवेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे नेते दुर्गादास कामत, संतोषकुमार सावंत, आनंद पार्सेकर आदी कार्यकर्ते तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज सरदेसाई, संजीव सरदेसाई, मंदार सरदेसाई, राजाराम दिवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शिवकालीन इतिहास असलेल्या श्री सप्तकोटीश्वर मंदिर परिसरात मांसाहारी रेस्टॉरंट चालत असल्याबद्दल सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली. मंदिराचे धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी हा प्रकार थांबला पाहिजे, असेही ते म्हणाले. हा विषय आपण मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांपर्यंत नेणार, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

नार्वेतील श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे पुरातत्त्व खात्यातर्फे नूतनीकरण करण्यात येत आहे. नूतनीकरण करताना पूर्वीच्या बांधकामात बदल करण्यात येणार नाही. गत सरकारमध्ये विजय सरदेसाई पुरातत्त्व खात्याचे मंत्री असताना जानेवारी 2019 मध्ये या कामाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र, काम अद्याप पूर्णत्वास आलेले नाही. त्याबद्दल विजय सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त केली. या दिरंगाईबद्दल प्रश्न उपस्थित करूनही समाधानकारक स्पष्टीकरण मिळालेले नाही, असे विजय सरदेसाई यांनी सांगून, ऐतिहासिक खाणाखुणांचे जतन करून या मंदिराचे नूतनीकरण काम त्वरित पूर्ण व्हावे, यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT