Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: 'ही' जाहिरात गोवेकरांची संधी कमी करण्यासाठी?

संगणक अभियंता पदांसाठी जाहिरातीवरुन सरदेसाई यांची सरकारला फटकारले

दैनिक गोमन्तक

गोवा सरकारने 7 ऑक्टोबर रोजी विधानमंडळ सचिवालयातील संगणक अभियंता पदांसाठी संधी मिळणार असल्याचे स्पष्ट करत याबाबत वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. यामध्ये संभाव्य उमेदवारांना मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याची अट देण्यात आली आहे. मात्र कोकणीबाबतचा कोणताही उल्लेख या जाहिरातीमध्ये नसल्याने गोवा फॉर्वर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारला फटकारले आहे.

(Vijay sardesai said Marathi compulsory for the posts of Computer Engineer in Legislature Secretariat could have cost jobs for Goans)

मिळालेल्या माहितीनुसार गोवा सरकारने 7 ऑक्टोबर रोजी विधानमंडळ सचिवालयातील संगणक अभियंता पदांसाठी वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द केली आहे. या पदासाठी कोकणीबाबतचा कोणताही उल्लेख नाही. मात्र मराठी भाषा अवगत असणे अनिवार्य असल्याची अट पाहून आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा सरकारला उद्देशुन एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये सरदेसाई यांनी म्हटले आहे की, मला आशा आहे की ही फक्त टायपिंगची चूक आहे आणि जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न नाही. तसेच गोव्यासाठी नोकरीच्या संधी कमी करणे असा तर सरकारचा प्रयत्न नाही ? असे म्हणत सरकारला कोकणी अनिवार्य करण्यासाठी सुचवले आहे.

जाहिरात शुद्धीपत्रक जारी करा

गोवा फॉर्वर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत भाष्य केले असून संबंधीत विभागाने गोवा विधानमंडळ सचिवालय संगणक अभियंता पदांसाठी जाहिरात शुद्धीपत्रक जारी करावे. असे ही त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार नवीन जाहिरात शुद्धीपत्रक जारी करत अनेक गोमंतकियांना नोकरी गमावण्यापासून वाचवावे असे ही त्यांनी म्हटले आहे. कारण मुळात नोकरीखेरीज अनेक युवक बेरोजगार आहेत. यात सरकारने असे केल्यास गोवासियांना नोकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेमुळेअनेक संधी गमावल्या लागतील असे ही त्यांनी म्हटले आहे.

विजय सरदेसाई यांनी सुचित केल्यानुसार प्रशासन या जाहिरातीमध्ये बदल करते, की आहे तीच लागू असणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण राज्यात बेरोजगारी हा मोठा मुद्दा आहे. तर राज्यशासन मराठी अनिवार्य अशी अट घालत जाहिरात देत आहे. त्यामूळे बदल कोण करणार हे पाहणए महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

BITS Pilani: ‘बिटस पिलानी’त फुड पॅकेटमध्ये सापडली सिगारेट! पार्सलची तपासणी सुरू; डिलिव्हरी कंपनीला सक्त इशारा

Rashi Bhavishya 14 September 2025: आर्थिक लाभाचे संकेत, कुटुंबात सौख्य; भावनिक तणाव टाळा

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT