Goa Shipyard: ''गोवा शिपयार्डला 'निवासी दाखला' देऊन मोठी चूक''

नंदादीप राऊत यांनी दिली आहे. तसेच गोवा शिपयार्डवर आरोप सुरुच
 Goa Shipyard
Goa Shipyard Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: राज्य पालिका संचालकाच्या हलगर्जीपणाच्या आदेशाने मुरगाव नगरपालिका मुख्याधिकार्‍यांनी वास्को येथील संरक्षण क्षेत्रातील गोवा शिपयार्ड कंपनीतील नवीन प्रशासन इमारतीला 'निवासी दाखला' देऊन मोठी चूक केली असल्याचा आरोप मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला आहे.

(Nandadeep Raut alleges Goa Shipyard Company mormugao)

गोवा शिपयार्ड कंपनीच्या नवीन प्रशासन इमारतीला 'निवासी दाखला' दिल्याप्रकरणी पालिका संचालकाला विचारले असता त्यांनी सांगितले की, मी आता 'निवासी दाखला' मागे घेण्यास असमर्थ आहे. यासाठी मुरगाव नगरपालिकेने 'निवासी दाखला' मागे घेण्यासाठी न्यायालयात जावे असे नमते घेऊन उत्तर दिले. अशी माहीती माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी दिली. पण आपण निर्णयावर ठाम असून गोवा शिपयार्ड कंपनीने राष्ट्रीय महामार्गाजवळ बांधलेली संरक्षक भिंत पाडण्यासाठी न्यायालयीन लढाईबरोबर आंदोलनाव्दारे प्रयत्न करत राहणार असे राऊत यांनी स्पष्ट केले.

 Goa Shipyard
Zilla Panchayat Election: दवर्लीतून अपक्षाची माघार; एकूण 15 उमेदवार रिंगणात

निवासी दाखला' देऊन पालिकेबरोबर वास्कोतील जनतेची फसवणूक

राज्य पालिका संचालकांने आपली मनमानी करून मुरगाव नगरपालिका मुख्याधिकार्‍याच्या सहकार्याने गोवा शिपयार्ड कंपनीच्या नवीन प्रशासन इमारतीला 'निवासी दाखला' देऊन पालिकेबरोबर वास्कोतील जनतेची फसवणूक केली आहे. जेव्हा पुर्वीची इमारत पाडून नवीन इमारत बांधकाम केल्यास पालिका, पंचायत, राज्य नियोजन विकास प्राधिकरणाच्या नियमानुसार इमारत बांधकाम रस्त्यापासून काही मिटर दूर घ्यावे लागते.

 Goa Shipyard
Goa Society: फोंडातील VPK अर्बन शाखेचे स्थलांतर

...तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुठे जावे?

गोवा शिपयार्ड कंपनीने सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून नवीन प्रशासन इमारत समोरील संरक्षक भिंत पालिका संचालक व मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या मदतीने 'जैसे थे' ठेवली आहे. राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार गोवा शिपयार्ड कंपनीने राष्ट्रीय महामार्गाला जोडून उभारलेली संरक्षक भिंत पाडायला पाहीजे. केंद्रीय संरक्षण विभागातील एक कंपनी जर राज्य सरकारने नेमलेले नियमाचे उल्लघन करीत असेल तर सामान्य जनतेने न्यायासाठी कुठे जावे? असा प्रश्न माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी केला आहे.

कृत्य एका प्रकारे भष्ट्राचारच

गोवा शिपयार्ड कंपनीने नवीन प्रशासन इमारत बांधल्यानंतर 2018 च्या मुरगाव नगरपालिकेबरोबर केलेल्या कराराचे राष्ट्रीय महामार्गापर्यन्त उभारलेली संरक्षक भिंत पाडणार असे लिखित स्वरूपात दिलेले आहे. यांची गोवा शिपयार्ड कंपनीने अंमलबजावणी केली पाहिजे.

पण गोवा शिपयार्डने मागच्या दाराने पालिका संचालकाकडून सरकारी नियमांचे उल्लघन करून पालिका मुख्याधिकारी कडून निवासी दाखला प्राप्त केला. हे कृत्य एका प्रकारे भष्ट्राचार केल्या सारखे असल्याची टीका माजी नगराध्यक्ष राऊत यांनी केली. गोवा शिपयार्डने नवीन प्रशासन इमारत कंपनीतील कामगारांच्या वाहन पार्किगच्या ठिकाणी उभारली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com