Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: कुजलेला हात सापडलेल्या ठिकाणाची विजय सरदेसाई यांनी केली पाहणी; विधानसभेत मांडणार मुद्दा

शांत फातोर्ड्यात अशा घटना हे कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचे उदाहरण

Akshay Nirmale

Vijai Sardesai: फातोर्डातील अंबाजी येथे शनिवारी सडलेल्या अवस्थेतील मानवी हात सापडला होता. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, हा हात ताब्यात घेत फॉरेन्सिकसाठी पाठवला होता.

दरम्यान, स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांनी रविवारी या ठिकाणी भेट दिली. या वेळी त्यांनी शांत असलेल्या फातोर्ड्यात अशा घटना समोर येणे हे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे द्योतक असल्याची टीका केली.

आमदार सरदेसाई म्हणाले की, शांततापूर्ण फातोर्ड्यात अशा घटना घडत आहेत, हे धक्कादायक आहे. ही घटना अतिशय विचित्र आहे. कुजलेला हात सापडला, पण मृतदेह सापडलेला नाही. हा खून आहे किंवा काय याची काहीही माहिती कुणाला नाही.

कुणीही हरवल्याची तक्रार पोलिसांत नोंद नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे हे एक उदाहरण आहे, राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. मी सोमवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे.

पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता राज्यात आहे. या सर्व मुद्यांवर विधानसभेत चर्चा करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कौटुंबिक वादांवरील धोरण स्वागतार्ह, पण 'नोकरशाहीचा अडथळा नको' - आपची मागणी

Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

SCROLL FOR NEXT