Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Vijai Sardesai Police Complaint: सभापती सरकारची कठपुतळी ठरत आहेत का? हा सहभाग गोमंतकीयांच्या आवाजाला दाबण्यासाठी व लोकशाहीची गळचेपी करण्यासाठी होता का?

Pramod Yadav

मडगाव: चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई अडचणीत सापडले आहेत. सभापती रमेश तवडकर यांच्याबाबत जातीय आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर यांनी याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे, आमदार विजय सरदेसाई आणि गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन जातीय आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

विजय सरदेसाई यांच्या वक्तव्याचा रोख सभापती रमेश तवडकर यांच्याकडे होता. आणि रमेश तवडरांचा आदिवासी समाजाशी संबंध आहे, असे मडकईकरांनी म्हटले आहे. पोलिसांनी योग्य कलमांच्या खाली कारवाई करावी, अशी मागणी धाकू मडकईकरांनी केली आहे.

दरम्यान, भाजपने अधिवेशनपूर्व नेते आणि मंत्र्यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सभापती रमेश तवडकरांनी देखील हजेरी लावली होती. यावरुन सरदेसाईंनी तवडकरांवर निशाणा साधला होता.

"भाजपने आयोजित केलेल्या बैठकीला सभापतींनी देखील हजेरी लावली. तवडकरांची हजेरी अनैतिक असून संविधानाशी प्रतारणा आहे. सभापतींची खूर्ची सत्ताधारी पक्षासाठी लोकशाहीची फॅमिली ड्रामाप्रमाणे स्क्रिप्ट लिहण्यासाठी नाही," असे विजय सरदेसाई म्हणाले होते.

"विधानसभेचे अध्यक्ष हे पक्षपात न ठेवता, निष्पक्ष व स्वायत्तपणे सभागृहाचे कामकाज चालवणारे असावेत, अशी अपेक्षा असते.

मात्र या बैठकीत अध्यक्षांची उपस्थिती ही त्यांच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. ते सरकारची कठपुतळी ठरत आहेत का? हा सहभाग गोमंतकीयांच्या आवाजाला दाबण्यासाठी व लोकशाहीची गळचेपी करण्यासाठी होता का?

अध्यक्षांचे खुर्ची ही भाजप प्रदेशाध्यक्षांची खुर्ची नाही! मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ‘टीम्स’ तयार करून विरोधकांना रोखण्याची करण्याची तयारी सुरू; ही लोकशाही आहे की नियोजित नाटक?", असे पक्षाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

Bicholim: डिचोलीत दोन विद्यार्थ्यांमध्ये मारामारी, व्हॉट्सअप ग्रुपवर चॅटिंग करताना झाला होता वाद, एकास अटक

Panjim: "गोव्यातील कलाकारांनाही मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी द्यावी", CM सावंतांचे प्रतिपादन

वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या जमिनीचा वाद, सरकारने हस्तक्षेप करावा; पालकांची मागणी

SCROLL FOR NEXT