Vijay Sardesai and Yuri Alemao in Goa Assembly Dainik Gomantak
गोवा

Goa Miles : गोवा माईल्सच्या सवलतीवरून विधानसभेत गदारोळ

विरोधक आक्रमक : कोरोना महामारीमुळे सवलत दिल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात 2018 पासून सुरू झालेल्या गोवा माईल्स या ॲप आधारित टॅक्सी सेवेला राज्य सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे सवलत दिल्याच्या कारणावरून विरोधक आक्रमक बनल्याने सभागृहात गदारोळ झाला. आमदार युरी आलेमाव, विजय सरदेसाई, मायकल लोबो यांनी आक्रमक भूमिका घेत या सवलतीला आक्षेप घेतल्यानंतर पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या मदतीला मुख्यमंत्री धावून आले आणि कोरोनामुळे सवलत दिल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

प्रश्‍नोत्तर तासात कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी या सवलतीच्या मुद्याचा प्रश्‍न पर्यटन मंत्र्यांना विचारला होता. राज्यात ही सेवा 2018 सुरू असली तरी सातत्याने वादग्रस्त राहिली आहे. स्थानिक टॅक्सीचालक आणि गोवा माईल्सचे चालक यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. मेसर्स फ्रोटामाईल्स ली. सोबत झालेल्या करारानुसार पहिल्या दीड वर्षानंतर एकूण नफ्याच्या 5 टक्के किंवा 20 लाख रुपये यापैकी जी रक्कम मोठी असेल, ती रक्कम कंपनीकडून राज्य सरकारला देण्यात येणार होती. त्यामुळे कंपनीने कराराचा भंग केलेला नाही, असे मत मंत्री खंवटे यांनी व्यक्त केले.

ॲप आधारित टॅक्सी सेवा अनिवार्य

बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपल्यातही बदल केले नाहीत, तर त्याचा फटका सर्वांना बसू शकतो. त्यामुळे गोवा माईल्ससारखी ॲग्रीगेटर ॲप आधारित टॅक्सी सेवा ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन ती सुरू केली पाहिजे. तरच राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळू शकेल, असेही खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT