Vijay Sardesai and his wife lit a lamp For Save MAHADAYI Save Goa Campanging  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: एक दिवा म्हादईसाठी! सरकारच्या डोक्यात प्रकाश पडो - सरदेसाईंची कोपरखळी

आपच्या नेत्या प्रतिमा कुतीन्हो यांनी पणजीतील मांडवी किनारी मेणबत्ती पेटवली

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: आपल्या खुर्चीसाठी म्हादईचा कर्नाटकशी सौदा करणारे आणि कर्नाटक राज्यात जाऊन तिथे त्या सरकारला निवडा असे आवाहन करणारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांचे सरकार गोवा विरोधी असून हे सरकार कायमचे घरी पाठवण्यासाठी सर्व गोमंतकीयानी एकत्र यावे अशी हाक गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज दिली.

रविवारी त्यांनी आपली पत्नी उषा सरदेसाई यांच्यासह गोयकार घरासमोर म्हादईच्या रक्षणासाठी पणत्या लावल्या. "उद्या म्हादई संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यात गोव्याची बाजू समर्थपणे मांडली जाणार आहे."

"मात्र, ज्या राजकारण्यांनी म्हादई विक्रीला काढली त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडो यासाठीच या पणत्या आणि मेणबत्त्या लावल्या जात आहेत" असे सरदेसाई यांनी सांगितले.

आज सासष्टी तालुक्यातही बऱ्याच घरांसमोर मेणबत्त्या लावल्या गेल्या. ही फक्त सुरुवात आहे. हे आंदोलन अधिकच तीव्र केले जाईल असे सरदेसाई यांनी सांगितले.

आपच्या नेत्या प्रतिमा कुतीन्हो यांनी पणजी येथे मांडवी किनारी येऊन मेणबत्ती पेटवली. या सरकारने मांडवीचा सौदा करताना सर्व गोवेकरांना काळोखात ठेवले. म्हादईचा घात करणाऱ्यांच्या डोक्यात उजेड पडावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे असे कुतीन्हो म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपतींनी मुर्मूंनी केला ‘वाघशीर’मधून प्रवास! ‘INS हंसा’ तळावर भव्य स्वागत; स्पेक्ट्रमची केली पाहणी

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

SCROLL FOR NEXT