Deepraj Gaonkar
Deepraj GaonkarDainik Gomantak

CK Nayudu Trophy : गोव्याचा एकटा दीपराज चंडीगडला भिडला; कुटल्या एवढ्या धावा

कर्णधारामुळे गोव्याची चंडीगडविरुद्ध द्विशतकी धावसंख्या

CK Nayudu Trophy : इतर प्रमुख फलंदाजांनी चंडीगडच्या गोलंदाजीसमोर नांगी टाकली, पण कर्णधार दीपराज गावकर याने जिगर प्रदर्शित केली. आक्रमक शैलीत झुंजार फलंदाजी करताना त्याने शानदार शतक ठोकले, त्यामुळे गोव्याला कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात रविवारी पहिल्या दिवशी द्विशतकी धावसंख्या उभारता आली.

चंडीगड येथील सेक्टर 16 स्टेडियमवर रविवारपासून चार दिवसीय सामन्यास सुरवात झाली. दीपराजच्या 164 चेंडूंत तडाखेबंद 138 धावांमुळे गोव्याने सर्वबाद 225 धावा केल्या. गोव्याच्या कर्णधाराने 20 चौकार व एक षटकारही मारला.

Deepraj Gaonkar
Rohit Sharma साठी जडेजा, सिराज, अश्विनने कॅप्टन्सीही केली कठीण, जेवतानाही करावा लागतोय विचार; Video

सामन्याच्या दिवसअखेर यजमान संघाने 1 बाद 43 धावा केल्या. ते अजून 182 धावांनी मागे आहेत. डावातील पहिल्याच चेंडूवर गोव्याच्या हेरंब परब याने प्रदीप यादव याला पायचीत बाद केले. त्यानंतर हरनूर सिंग व कर्णधार अर्जुन आझाद यांनी गोव्याला आणखी यश मिळू दिले नाही.

जबाबदार शतकी खेळी

गोव्याला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर पंधराव्या षटकात त्यांची 3 बाद 22 अशी स्थिती झाली. पहिलाच सामना खेळणाऱ्या शिवम आमोणकरला फक्त सहा धावा करता आल्या, रणजीपटू मंथन खुटकर पाचच चेंडू टिकला. तो चार डावात दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला.

राहुल मेहताही मोठी धावसंख्या रचू शकला नाही. दीपराजने संघाला सावरताना कश्यप बखले याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी 67 धावांची, तर वासू तिवारी याच्यासह पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला सव्वाशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

कश्यप जम बसत असताना बाद झाला, तर वासू पुन्हा एकदा धावबाद झाला. नंतर तळाच्या फलंदाजांच्या साथीने दीपराजने खिंड लढविली व गोव्याला द्विशतक पार करून दिले. चंडीगडच्या पारस याने 57 धावांत 5 गडी बाद केले.

Deepraj Gaonkar
India vs Australia: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज बाहेर, जाणून घ्या कारण

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 71.4 षटकांत सर्वबाद 225 (राहुल मेहता 15, शिवम आमोणकर 6, मंथन खुटकर 0, कश्यप बखले 25, दीपराज गावकर 138, वासू तिवारी 14, मनीष काकोडे 1, कीथ पिंटो 10, हेरंब परब 2, जगदीश पाटील नाबाद 2, समीत आर्यन मिश्रा 0, करण शर्मा 1-34, रोहित धांडा 2-40, पारस 5-57, सी. धिंडसा 1-10).

चंडीगड, पहिला डाव : 11 षटकांत 1 बाद 43 (हरनूर सिंग नाबाद 16, अर्जुन आझाद नाबाद 25, हेरंब परब 1-19).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com