Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: विजय-माविनमध्ये जोरदार खडाजंगी! आयडीसी, जमीन रुपांतरणावरून आरोप

Goa Assembly Session 2026 Latest Update: उद्योग विकास महामंडळाचे (आयडीसी) भूखंड आणि जमीन रुपांतरणावरून आमदार विजय सरदेसाई आणि उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: उद्योग विकास महामंडळाचे (आयडीसी) भूखंड आणि जमीन रुपांतरणावरून आमदार विजय सरदेसाई आणि उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. चुकीचे निर्णय घेऊन उद्योग खात्याने आयडीसीचे ५२ कोटींचे नुकसान केले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सभागृह समिती करावी.

त्यात आपल्याला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करीत तीन महिन्यांत हा घोटाळा उघड न केल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे आव्हानही विजय यांनी सरकारला दिले. ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’च्या नावाखाली भूखंड वाटपाच्या प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे ‘आयडीसी’ला ५२ कोटींचे नुकसान झाले आहे.

तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सभागृह समिती स्थापन करावी. त्यात आपल्याला सहभागी करून घ्यावे. पुढील तीन महिन्यांत हा घोटाळा उघड न केल्यास २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे सरदेसाई म्हणाले

‘जमीन रुपांतरणाचे विजयच जनक’

विजय सरदेसाई यांनी नगरनियोजन खात्याचे (टीसीपी) मंत्री असताना कलम १६ ‘ब’ आणून राज्यातील जमिनींचे रुपांतरण करण्यास सुरुवात केली. जमीन रुपांतराचे जनक सरदेसाई हेच आहेत आणि तेच आता भाजप सरकारवर ३९ ‘अ’वरून टीका करीत आहेत’’, अशी टीका मंत्री माविन गुदिन्हो यांनी केली. त्यावर १६ ‘ब’ अंतर्गत झालेल्या जमीन रुपांतरण प्रकरणांची सरकारने चौकशी करावी, असेही आव्हान सरदेसाईंनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT