Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक अत्यंत भीषण अपघात घडला.
Mumbai-Goa Highway Accident
Mumbai-Goa Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक अत्यंत भीषण अपघात घडला. लवेळ येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी (30 ऑगस्ट) सायंकाळी सुमारे 5:10 वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या दोन 14 वर्षीय मुलींना जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या असून, कारमधील प्रवासीदेखील जखमी झाले. मानसी केशवन शर्मा आणि यास्मिन निजाम पटाईत अशी जखमी झालेल्या अल्पवयीन मुलींची नावे असून, त्या लवेळ येथीलच रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 'टाटा पंच' (क्रमांक MH 12 TY 4381) ही कार मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. लवेळ पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याने चालणाऱ्या मुलींना उडवले आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उलटली. या भीषण धडकेत कारमधील एक पुरुष आणि एक महिला प्रवासीसुद्धा जखमी झाले.

Mumbai-Goa Highway Accident
Mumbai Goa Highway: कोकणवासियांच्या खिशाला फटका! मुंबई-गोवा महामार्गावरील 'या' टोलनाक्यावर दरवाढ; वाहनचालकांना भरावे लागणार 'इतके' पैसे

अपघाताचा (Accident) आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताचे दृश्य आणि कारचे झालेले मोठे नुकसान दर्शवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Mumbai-Goa Highway Accident
Goa Mumbai Highway: गोवा-मुंबई महामार्गावर उत्पादन शुल्कची मोठी कारवाई! तळेरे-कणकवली येथे 90 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त, वाहनचालकाला अटक

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील खेड परिसरातील जगबुडी नदीच्या पुलावर घडलेल्या आणखी एका जुन्या अपघाताची घटना सध्या चर्चेत आली आहे. 'मॅगी नूडल्स' घेवून जाणारा एक भरधाव ट्रक जगबुडी नदीच्या पुलाचे कठडे तोडून थेट 100 फूट खोल नदीत कोसळला होता. ही दुर्घटना जुलै महिन्यात घडली होती. पुराच्या पाण्याच्या प्रचंड वेगामुळे ट्रक आणि त्यातील माल वाहून गेला होता. या अपघातात ट्रक चालक बेपत्ता झाला होता. महामार्गावरील सातत्याने होणारे हे अपघात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com