Kingfisher house new owner Dainik Gomantak
गोवा

Kingfisher Villa Goa: 900 कोटींच्या कर्जामुळे लिलाव; विजय मल्ल्याच्या गोव्यातील 'किंगफिशर व्हिला' चा नवीन मालक कोण? चालवतो दारूची कंपनी

Kingfisher Villa Goa Auction: गोव्यातील किंगफिशर व्हिला त्याच्या आलिशान परिसरासाठी ओळखला जातो, मात्र त्याचा लिलाव झाला आणि यानंतर व्हीलचा मालक बदलला

Akshata Chhatre

Vijay Mallya Kingfisher Villa: एकेकाळी 'किंग ऑफ गुड टाईम्स' म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक विजय मल्ल्या सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी १८ वर्षांपूर्वी यजमानपद स्वीकारलेल्या केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाने आयपीएल २०२५ चे विजेतेपद पटकावल्याने मल्ल्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. तुम्हाला माहितीये का विजय मल्ल्या यांचा गोव्यातील किंगफिशर व्हिला त्याच्या आलिशान परिसरासाठी ओळखला जातो, मात्र त्याचा लिलाव झाला आणि यानंतर व्हीलचा मालक बदलला. चला मग जाणून घेऊया विजय मल्ल्या यांच्या आलिशान व्हिलावर नेमकं कोणाचं राज्य आहे?

'किंगफिशर व्हिला'चा नवा अध्याय

विजय मल्ल्यांच्या आठवणींमध्ये गोव्यातील त्यांचा अलिशान 'किंगफिशर व्हिला' नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज आणि इतर अनेक आर्थिक गैरव्यवहारांमुळे डिफॉल्ट झाल्याने २०१७ मध्ये हा व्हिला लिलावात विकला गेला.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे सचिन जोशी आणि उर्वशी शर्मा यांनी हा व्हिला ७३.०१ कोटी रुपयांना विकत घेतला आणि त्याचे नाव 'किंग मन्शन' असे बदलले.

हा व्हिला तीन एकर भूखंडावर १२,३५० चौरस फुटांच्या बांधकामासह विस्तृत जागेत पसरलेला आहे. २०१७ मध्ये जोशी आणि त्यांच्या पत्नीने तो किंगफिशर एअरलाईन्सची मूळ कंपनी युनायटेड ब्रुअरीज होल्डिंग्जकडून विकत घेतला होता.

कोण आहेत हे सेलिब्रिटी?

सचिन जोशी हे जेएमजे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक जगदीश जोशी यांचा मुलगा आहे. ते स्वतः मद्य व्यवसायात गुंतलेले असून, त्यांचे 'किंग्स बिअर' नावाचे एक उत्पादन बाजारात आहे. अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी 'आझान' या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर 'मुंबई मिरर' आणि 'जॅकपॉट' या चित्रपटांतही त्यांनी काम केले. 'आशिकी २' च्या तेलुगू रिमेकमध्ये त्यांनी आदित्य रॉय कपूरची भूमिका साकारली होती, ज्याचे नाव 'नी जथागा नेनुंदाली' असे होते.

दुसरीकडे, त्यांची पत्नी उर्वशी शर्मा 'नकाब', 'खट्टा मीठा', 'बाबर', 'थ्री', 'चक्रधार' आणि 'आक्रोश' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती 'खतरों के खिलाडी' सीझन १ मध्ये पहिली रनर-अपही होती. विजय मल्ल्यांच्या संघाने आयपीएल जिंकल्याने त्यांच्या भूतकाळातील आणि सध्याच्या मालमत्तांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT