Vijay Mallya Case: लंडन उच्च न्यायालयाचा निर्णय; विजय माल्ल्या ' दिवाळखोर ' घोषित

भारतीय बँकांच्या संघाने लंडन उच्च न्यायालयाला (London high-Court) विजय माल्ल्यास 'दिवाळखोर' (Bankrupt) घोषित करण्याची केली होती मागणी. (Vijay Mallya Case)
Businessman Vijay Mallya (Vijay Mallya Case:)
Businessman Vijay Mallya (Vijay Mallya Case:) Dainik Gomantak

Vijay Mallya Case: भारतातील विविध बँकांमधून सुमारे 9 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम थकवणाऱ्या उद्योगपती विजय माल्ल्याला (Businessman Vijay Mallya) लंडन उच्च न्यायालयाने (London High-Court) देखील ' दिवाळखोर ' (Bankrupt) घोषित केले आहे. भारतातील जवळपास सतरा बँकांच्या तोंडाला चुना लावून भारतातून फरार झालेला माल्ल्या ब्रिटन मध्ये आश्रय घेत होता. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताकडून देखील आठोकाठीचे प्रयत्न सुरु आहेत. आज (दि. २६ जुलै) लंडनच्या उच्च न्यायालयाने देखील विजय माल्ल्याला 'दिवाळखोर' ठरवून त्याच्या लंडन मधील वास्तव्याला जोरदार झटका दिला आहे. त्याचबरोबर 'एसीबीआई'(State Bank of India) च्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांच्या संघाने मल्ल्याच्या किंगफिशर विमान कंपनीला (Kingfisher Air Lines) दिलेल्या कर्ज वसुली संबंधित खटला जिंकल्यामुळे माल्ल्याच्या चिंतेत अजूनच भर पडली आहे. आता लंडन उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. तरीही लंडनच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे प्रयत्न मल्ल्याकडून केले जाणार असल्याचे समोर आले आहे.

Businessman Vijay Mallya (Vijay Mallya Case:)
स्वीस बॅंकेतील पैशाच्या मुद्यावर मोदी सरकारने दिले अखेर उत्तर

एसबीआयच्या बँकेच्या नेतृत्वात बँकांच्या संघात बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक, आयडीबीआय बँक, कोर्पोरेशन बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, यूको बँक, युनिटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनान्शिअल ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. आदीं मुख्य बँकांचा समावेश आहे. बँकांच्या संघाने विजय मल्ल्या याला ' दिवाळखोर ' घोषित करण्याच्या याचिकेवर झालेलया वर्चुअल सुनावणीमध्ये भारतीय बँकांच्या बाजूने निकाल देत, लंडन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मायकल ब्रिग्स यांनी विजय माल्ल्याला ' दिवाळखोर ' घोषित केले. किंगफिशर कंपनीचे सर्वेसर्वा व आता दिवाळखोर म्हणण्यास काहीच हरकत नसलेले विजय माल्ल्या हे प्रसारमाध्यमांद्वारे स्वतःचा ' भगोडा ' असा उल्लेख करत असल्याने नाराजी व्यक्त केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com