Vijai Sardesai, Davorlim  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: दवर्ली शैक्षणिक संकुलाबाबत सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव; आमदार सरदेसाई

Davorlim Educational Complex: चतुर्थीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलून तोडगा काढू असे सरदेसाई म्हणाले

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: दवर्ली येथे दहा वर्षांपूर्वी शैक्षणिक संकुलासाठी सरकारने १.२० लाख चौरस मीटर जागा संपादन केली आहे, परंतु अजून मडगावमधील शाळा तिथे हलविण्यासाठीची प्राथमिक स्तरावरील प्रक्रियाही सुरु झालेली नाही. जागा जशी आहे तशीच आहे. शिवाय त्या जागेवर अतिक्रमणही झाल्याचे कळते. यासंदर्भात फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी या शैक्षणिक संकुलाबाबत सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे सांगितले.

कोकणी भाषा मंडळ संचालित रवींद्र केळेकर ज्ञानमंदिर परिसरातील एका नव्या रस्त्याचे भूमिपूजन व नंतर शाळेतर्फे आयोजित वनमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

सरदेसाई यांनी सांगितले की, मडगाव व परिसरातील शाळा या संकुलात स्थलांतरित केल्यास मडगावमधील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.

रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी या शाळेत जागे अभावी एका इयत्तेचे एकापेक्षा जास्त वर्ग सुरु येत नाही. एव्हाना शाळेचा उच्च माध्यमिक विभागही सुरु केला असता. दवर्ली येथील शाळा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याची त्यांनी सरदेसाई यांच्याकडे मागणी केली.

मुख्याध्यापक अनंत अग्नी यांनी सांगितले की, शाळेसाठी रस्त्याची गरज होती व आम्ही तशी मागणीही केली होती. आमदार सरदेसाई यांनी तत्परता दाखविल्याबद्दल आभार मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी, नगरसेवक, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळांना विरोध का?

आपण यासंदर्भात चतुर्थीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलून तोडगा काढू. या जागेसंदर्भात तसेच शाळा स्थलांतरित करण्यास स्थानिक लोकांच्या काही मागण्या असतील त्यावर देखील तोडगा काढावा लागेल. मुख्य म्हणजे शाळांना विरोध का केला जातो हेच कळत नसल्याचे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT