vijai sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: 'एक देश एक निवडणूक' गोव्याच्या हिताची नाही; यात छोट्या राज्यांचे नुकसान

आमदार विजय सरदेसाईंचे मत; परप्रांतीयांवर कडक पाळत ठेवा, प्रत्येक तालुक्यात महिला पोलिस ठाणे सुरू करा...

Akshay Nirmale

Vijai Sardesai: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सध्या देशात पुन्हा चर्चेत आलेल्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला विरोध दर्शविला आहे. नुकतेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संकल्पनेचे कौतूक करत पाठिंबा दर्शविला होता.

त्याविषयी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, एक देश एक निवडणूक हा विषय सर्वप्रथम गोव्यात मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना समोर आला होता. तेव्हा मी पर्रिकरांच्या मंत्रीमंडळात होतो. मी एनडीए चा सदस्य असूनही एक राष्ट्र एक निवडणूकीला विरोध केला होता.

जर एक राष्ट्र एक निवडणूक झाली तर गोव्यासारख्या छोट्या राज्याचे नुकसान होईल. गोवा छोटे राज्य आहे. गोव्याची स्वतःची अशी अस्मिता आहे. गोव्याचे प्रश्न छोटे आहेत. अशा पद्धतीच्या निवडणुकीमुळे केवळ राष्ट्रीय मुद्यांनाच महत्व येईल. छोट्या राज्यांचे छोटे प्रश्न दुर्लक्षित राहतील.

दरम्यान, गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील पोलिस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. गोवा हे छोटे राज्य असूनही येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गोव्यात गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण 7 पेक्षाही खाली आले आहे.

गोवा हे गुन्हेगारांसाठी सॉफ्ट टार्गेट बनले आहे. राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी का वाढत आहे, याचे गृहमंत्र्यांनी आत्मपरीक्षण करावे. गोमंतकीयांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.अतिसंवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. परप्रांतीयांवर कडक पाळत ठेवा. पोलिसांची गस्त वाढवा. प्रत्येक तालुक्यात महिला पोलिस ठाणे सुरू करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कुंपणच शेत खातं तेंव्हा..! अपघात झाला, चालक झाला गंभीर जखमी; संधी साधून कॉन्स्टेबलने पळवले 8 लाखांचे दागिने

Kala Academy: नाट्यगृह व्यवस्थापकाचे नाटक स्पर्धेत कसे? दबक्या आवाजात चर्चा; संबंधित कर्मचारी करणार खुलासे सादर

मृत्यूनंतर 7 वर्षांनी आली पाडकाम नोटीस! प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी; न्यायालयाने GCZMA ला फटकारले

Panaji: पणजीतील 'हा' मार्ग अचानक बंद! वाहतूक वळवली; काय आहे कारण? पहा..

Football Match Fixing: फुटबॉल मॅचफिक्सिंग प्रकरण! आरोपपत्रात 14 खेळाडूंचा समावेश; GFA समितीची चौकशी अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT