Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : विरोधकाची भूमिका समर्थपणे निभावण्यास मी तयार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सर्व स्तरावर अपयशी ठरलेले मुख्यमंत्री असल्याने ते विरोधकांना घाबरतात, असा टोलाही सरदेसाई यांनी लगावला आहे.

सुशांत कुंकळयेकर

Vijai Sardesai : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सर्व स्तरावर अपयशी ठरलेले मुख्यमंत्री असल्याने ते विरोधकांना घाबरतात. त्याचमुळे त्यांनी काँग्रेस पक्षात होलसेल फूट घालून विधानसभेत विरोधी पक्षनेताच राहणार नाही याची तजवीज केली आहे. असे जरी असले मी जोपर्यंत विधानसभेत असेल तोपर्यंत विरोधकांची भूमिका समर्थपणे पार पाडू, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेता नसतानाही ही भूमिका कशी निभावता येणे शक्य आहे हे मी मागच्या अधिवेशनात दाखवून दिले आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेने घाबरू नये, त्यांचा आवाज प्रखरपणे विधानसभेत मी मांडणार याची खात्री त्यांनी बाळगावी, अशी प्रतिक्रिया विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

या पक्षांतरावर त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळी ते म्हणाले, हे एक दिवस असे होणार याची सर्वानाच अपेक्षा होती. कारण ज्या दिवशी मुख्यमंत्री सावंत यांचा शपथविधी झाला त्या दिवसापसूनच काँग्रेस आमदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते.

मात्र काँग्रेसच्या या आमदारांनी लोकांच्या लोकशाहीवरील भावार्थाला तडा दिला आहे. याच आमदारांनी आपण काँग्रेस पक्षाशी प्रतारणा करणार नाही अशी शपथ सर्व धर्मांच्या देवासमोर घेतली होती याची आठवण सरदेसाईंनी करुन दिली. पितृपक्ष चालू असताना हे आमदार भाजपात गेले आहेत. त्यामुळे त्यांना देवांचाही पाठिंबा नसेल, असे सरदेसाई म्हणाले.

हे आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आहेत. त्यासाठी त्यांनी पैसेही घेतले आहेत असा आरोप सरदेसाईंनी केली आहे. त्यामुळे सरकारी कामे करून घेण्यासाठी सामान्य लोकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे. सरकारात भ्रष्टाचार आणखीनच वाढणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT