Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : प्रमोद सावंतांनी गृहमंत्री पदाचा तातडीने राजीनामा द्यावा

गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून पोलीस आपले कर्तव्य योग्यपणे बजावत नसल्याचा सरदेसाईंचा निशाणा

अनिल पाटील

Sonali Phogat case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून पोलीस आपले कर्तव्य योग्यपणे बजावत नसल्याने गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री पूर्णतः अपयशी ठरल्याने त्याने गृहमंत्री पदाचा तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केले आहे.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भाजपच्या नेत्या सोनाली फोगट यांची हत्या, आणि त्यानंतर ड्रग्स प्याडलर आणि संबंधित कर्लीस बारच्या मालकाला होणारी अटक हे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे बाब आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार काढून घेण्यासाठीच्या हालचालीवर टीका केली. घटना दुरुस्तीच्या कलम ११ आणि १२ या अधिसूचित कायद्यावरच सरकार गदा आणत असून सरकारने पंचायतींना निष्काम केले आहे. आता सरकार नगरपालिकांचेही अधिकार आपल्याकडे घेऊ पाहत असून हे एक प्रकारचे भ्रष्टाचारासाठीचे एकत्रीकरण आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरीकडे सरकारच्या खात्यात हजारो करोड रुपये शिल्लक असताना सरकार, सामाजिक योजनांचे पैसे देण्यास टाळाटाळ करते. अनेक महिन्याचे एकत्रित पैसे देऊन चतुर्थीचे 'गिफ्ट' म्हणते हे नक्की कशाचे लक्षण आहे. याबाबतही त्यांनी प्रश्न विचारला आहे.

दरम्यान सोनाली फोगट हत्याप्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत गोव्याचे मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांची कसून चौकशी केली जाणार असून जे या संपूर्ण प्रकरणात दोषी आढळतील, त्यांना 100 टक्के शिक्षा दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

सोनाली फोगट प्रकरणात ड्रग पेडलर असो किंवा क्लब चालक. सर्वांची सखोल चौकशी गोवा पोलिसांकडून केली जाईल आणि जे दोषी आढळतील त्यांना कठोर शासन केलं जाईल. याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. गोवा हे एक पर्यटन राज्य असल्याने नेहमीच पर्यटकांचं अतिथी देवो भव म्हणत स्वागत केलं जातं. त्यामुळे पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी सोनाली फोगट यांना ड्रिंकमधून ड्रग्ज दिल्याप्रकरणी प्रश्न विचारलं असता पोलीस तपास सुरु असून त्यावर आताच काही बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान पोलिसांनी सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी हणजूण पोलिसांनी वाळपईमधील ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर याला अटक केली आहे. तसंच कर्लिस क्लबचा मालक एडवीन नुनीस यालाही हणजूणमधून अटक केली आहे. त्याच्या बाथरुममधून पोलिसांना 2.20 ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. या दोघांचीही पोलीस कसून चौकशी करत असून मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT