Sonali Phogat case : सोनाली फोगट हत्याप्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत

गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात असल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Sonali Phogat case : सोनाली फोगट हत्याप्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत गोव्याचे मुख्यमंंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांची कसून चौकशी केली जाणार असून जे या संपूर्ण प्रकरणात दोषी आढळतील, त्यांना 100 टक्के शिक्षा दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

सोनाली फोगट प्रकरणात ड्रग पेडलर असो किंवा क्लब चालक. सर्वांची सखोल चौकशी गोवा पोलिसांकडून केली जाईल आणि जे दोषी आढळतील त्यांना कठोर शासन केलं जाईल. याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. गोवा हे एक पर्यटन राज्य असल्याने नेहमीच पर्यटकांचं अतिथी देवो भव म्हणत स्वागत केलं जातं. त्यामुळे पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी सोनाली फोगट यांना ड्रिंकमधून ड्रग्ज दिल्याप्रकरणी प्रश्न विचारलं असता पोलीस तपास सुरु असून त्यावर आताच काही बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Goa CM Pramod Sawant
Sonali Phogat case : सोनाली फोगट हत्येची सीबीआय चौकशी व्हावी

दरम्यान पोलिसांनी सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी हणजूण पोलिसांनी वाळपईमधील ड्रग पेडलर दत्तप्रसाद गावकर याला अटक केली आहे. तसंच कर्लिस क्लबचा मालक एडवीन नुनीस यालाही हणजूणमधून अटक केली आहे. त्याच्या बाथरुममधून पोलिसांना 2.20 ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. या दोघांचीही पोलीस कसून चौकशी करत असून मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com