Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : 'भारत जोडो'मध्ये सहभागी झालो तर BJP आणि RG च्या पोटात का दुखले?

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्यानंतर विजय सरदेसाई यांच्या विरोधात स्थानिक भाजपने प्रचार आघाडी उघडलेली असतानाच विजय सरदेसाई यांनी सरकारवर पलटवार केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai on Bharat Jodo Yatra : मी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झालो म्हणून भाजप आणि आरजीच्या पोटात का दुखले? असा सवाल करून मी काही एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो नव्हतो किंवा एनडीएच्या नेत्यांना भेटलो नाही. निवडणुकीत ज्या पक्षांशी आमची युती आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी भेटण्यासाठी गेलो होतो. भाजपला घरी बसविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी संघटित युती करण्याची गरज मी पदोपदी व्यक्त केली आहे. आता अशी युती होणार या भीतीने या विरोध करणाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा तर आला नाही ना? असा सवाल सरदेसाई यांनी केला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील झाल्यानंतर विजय सरदेसाई यांच्या विरोधात स्थानिक भाजपने प्रचार आघाडी उघडलेली असतानाच विजय सरदेसाई यांनी सरकारवर पलटवार केला. ‘हे सरकार फक्त ‘इव्हेंट’ आयोजन करून त्यावरील कमिशनची मलई खाण्यातच गर्क आहे. कोसळलेल्या प्रशासनाचे त्यांना काहीच पडून गेलेले नाही’, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारचे हे गौडबंगाल लवकरच उजेडात आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

फातोर्डा येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी हा हल्लाबोल केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ते इफ्फी महोत्सव या सर्व आयोजनात मंत्र्यांनी कमिशन घेऊन पैसा केला आहे. या सरकारमधील मंत्री इव्हेंट कंपन्यांचे भागीदार बनले आहेत. हे कार्यक्रम राज्याच्या भल्याचे नसून काही मंत्र्यांचे खिसे भरण्यासाठी आहेत. या सर्व कार्यक्रमांची मी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मागितली आहे. ती हाती आल्यावर या सर्वांना उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला.

सध्या गोव्यात रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याबाबत सरकारला धारेवर धरताना सरदेसाई म्हणाले, जुने गोवे येथील फेस्त दोन दिवसांवर आलेले असताना रस्त्याखालून केबल टाकण्यासाठी पिलार बाजूने रस्ता फोडून ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Rakhi 2025 Lucky Colors: रक्षाबंधन विशेष, राशीनुसार कपड्यांचे आणि राखीचे कोणते रंग शुभ आहेत? जाणून घ्या

Nagpanchami 2025: संपूर्ण गोव्यात नागपंचमी उत्साहात साजरी

Free Train To Konkan: चाकरमान्यांका बाप्पा पावलो! गणेशोत्सवात दादर ते कुडाळ करता येणार 'मोफत प्रवास', एका कॉलवर करा बुकिंग

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

SCROLL FOR NEXT