MLA Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

'कोणी दुखावले असल्‍यास सॉरी', मराठीबाबत वक्तव्याप्रकरणी आमदार सरदेसाईंनी सभागृहात मागितली माफी

Vijai Sardesai: राजभाषा अधिनियमानुसार मराठीचे स्‍थान, वापरामागील उद्देश मला ज्ञात आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘आमदार सुदिन ढवळीकर यांना थट्टेने मी ‘मराठी नको, कोकणीत बोला’, असे म्‍हटले होते. माझ्‍या वक्‍तव्‍यामुळे कुणी दुखावले असल्‍यास ‘सॉरी’ म्‍हणण्‍यात काही गैर नाही’, असे आमदार विजय सरदेसाई यांनी आज विधानसभा सदनात स्‍पष्‍ट केले.

‘सुदिन ढवळीकर यांच्‍यासोबत आपले स्‍नेहाचे संबंध आहेत. सदनात बऱ्याच सदस्‍यांना कोकणी समजते, म्‍हणून आपण ‘कोकणीतून बोला’, असे विधान केले. राजभाषा अधिनियमानुसार मराठीचे स्‍थान, वापरामागील उद्देश मला ज्ञात आहे.

मी सर्व भाषांचा आदर करतो. मराठी भाषेला श्रीमंती, समृद्ध वारसा, संस्‍कृतीचे अधिष्‍ठान आहे. माझ्‍या वक्‍तव्‍याचा अन्‍य अर्थ काढला गेला’, असेही अखेरीस सरदेसाई म्‍हणाले. मराठी विषयावरून केलेल्‍या वक्‍तव्‍यामुळे मराठीप्रेमींमध्‍ये नाराजीचे वातावरण होते. त्‍या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आज उपरोक्‍त स्‍पष्‍टीकरण दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT