Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'फलक फाडाल तर याद राखा'! विजय सरदेसाईंनी दिला सज्जड इशारा, Watch Video

Vijai Sardesai: गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार प्रचारार्थ रात्री दिवाड येथे उमेदवार विक्रम परब यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: खोर्ली मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचे फलक फाडले गेल्याची दखल पक्षप्रमुखांनी घेतली. आमदार विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी दिवाडी येथील प्रचारसभेत फलक फाडले जात असतील तर खपवून घेणार नाही, आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी जारी झाली तरी काही पक्षांच्या उमेदवारांनी यापूर्वीच प्रचार सुरू केला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार प्रचारार्थ रात्री दिवाड येथे उमेदवार विक्रम परब यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

जिल्हा पंचायतीत भाजप सरकारला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. सरदेसाई यांनी स्थानिक आमदारांचे कार्यकर्ते आमच्या उमेदवारांचे प्रचाराचे फलक फाडतात, त्यामुळे आम्हीही गप्प बसणार नाही. तर आम्हीसुद्धा तुमचे फलक फाडू, त्यामुळे आमच्या बॅनरला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार करावा, असा इशाराही त्यांनी दिला.

विधानसभेतही काँग्रेसबरोबर!

आपण २०२७ च्या विधानसभेतही काँग्रेसबरोबर असू. आपण राहुल गांधींना शब्द दिल्यामुळे काँग्रेसशी जोडलेलो आहोत, असे सांगत सरदेसाई यांनी युती कायम राहिल, असे सूतोवाच केले. युतीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. ते आमच्याशी, आरजीशीही चर्चा करताहेत; निवडणूक जाहीर झालीय. त्यामुळे युतीच्या घोषणेची निकड आहे. उमेदवार निश्चितीची आम्ही वाट पाहू शकत नव्हतो, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारताची अणुऊर्जेत मोठी झेप! कल्पक्कममध्ये 'फास्ट ब्रीडर रिएक्टर' यशस्वी, PM मोदींकडून अभिनंदन; होमी भाभांचे स्वप्न साकार

Supreme Court: रागाच्या भरात दिलेली शिवी गुन्हा ठरणार नाही! 'बास्टर्ड' शब्दावरुन झालेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द; नेमकं प्रकरण काय?

Cricket Record: दोन दिग्गज, एक संघ, दशकांचा काळ! 90 टेस्ट आणि 307 वनडे सामने एकत्र खेळले; पण 'या' बहाद्दरांची जोडी बॅटिंगसाठी कधीच जमली नाही

इशानचा 'ड्रग्‍स कॉकटेल' मुळेच मृत्‍यू, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! शरीरात 5 अमलीपदार्थांचे अंश

Air India Ticket Price Hike: एअर इंडियाचा 'हाय व्होल्टेज' झटका! 8 एप्रिलपासून विमान प्रवास महागणार, फ्यूल सरचार्जमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या किती वाढले भाडे

SCROLL FOR NEXT