Velsao Dainik Gomantak
गोवा

Velsao: 'ती' खडी दोन दिवसांत हटवा! वेळसावात तिढा कायम; जिल्हाधिकाऱ्यांची कंत्राटदाराला नोटीस

Velsao Villagers Delegation Meets South Goa Collector: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली वेळसाव येथील गावकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांची भेट घेतली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली वेळसाव येथील गावकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने आज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्‌स यांची भेट घेतली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे विकास निगमच्या कंत्राटदाराला १५ ऑगस्टपूर्वी वेळसाव येथे रस्त्यावर टाकलेली खडी आणि अन्य साहित्य हटविण्याचे आदेश दिले. काही दिवसांपूर्वी लोकांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर रेल्वे कंत्राटदाराने हे साहित्य टाकल्याने ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी रेल विकास निगम लिमिटेडला दुहेरी रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित जागेवरील हे बांधकाम साहित्य १५ ऑगस्टपूर्वी पूर्णपणे हटविण्याचे थेट निर्देश दिले आहेत.

‘जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे रेल्वेचे हे काम बेकायदेशीर होते, हे आता सिद्ध झाले आहे. वेळसावमधील जनतेने आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे. यापुढे आम्ही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेणार नाही. रेल्वे कंत्राटदाराने हे साहित्य हटविले नाही, तर लोक रस्त्यावर उतरून ते हटवतील,’ असा इशारा सरदेसाई यांनी दिला.

काँग्रेस खरोखर गंभीर आहे का?

भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्ष खरोखरच गंभीर आहे का, असा प्रश्न अमित पाटकर यांनी उपस्थित केला आहे. गेल्या चार वर्षांपासून आपण पक्ष मजबूत करण्यासाठी वेळ खर्ची घातला. असे असतानाही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘तो’ व्हील लोडर जप्त

वेळसाव येथे खडीचा ढिगारा हटविण्यासाठी वापरण्यात आलेला व्हील लोडर भारतीय रेल्वेने जप्त केला आहे. तो अमित पाटकर यांच्या मालकीचा असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या संदर्भात पाटकर यांनी रेल्वे व्यवस्थापनावर टीका केली असून, हा दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT