सोशल मीडियावर सरकारी नोकरीचे आमिष! गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement: गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावाने सोशल मीडियावर भरतीची बनावट आणि अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement
Goa Staff Selection Commission fake recruitment advertisementDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा कर्मचारी निवड आयोगाच्या नावाने सोशल मीडियावर भरतीची बनावट आणि अनधिकृत जाहिरात केल्याप्रकरणी गोवा सायबर गुन्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तथापि, नोकरी शोधणाऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. गोवा कर्मचारी निवड आयोग गट ‘क’ पदांसाठी २१५ पदे रिक्त असल्याची जाहिरात केली होती.

या शीर्षकाखाली ही खोटी जाहिरात ‘एम्प्लॉयमेंट न्यूज - रोजगार समाचार’ नावाच्या फेसबुक पेजवरून प्रसारित केली आहे. ही जाहिरात अधिकृत असल्याचे भासवून उमेदवारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement
Goa Casino Case: प्रतिज्ञापत्र वेळेत दाखल करा, अन्यथा दंड! 'कॅसिनो' प्रकरणात गोवा खंडपीठाचा प्रतिवादींना स्पष्ट इशारा

अशा अनधिकृत जाहिरातींमुळे नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची फसवणूक होणे, त्यांची वैयक्तिक माहिती चोरीला जाणे किंवा पैशांची मागणी करून त्यांची आर्थिक लूट होण्याचा मोठा धोका असतो. याची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, ही बनावट जाहिरात तयार करणाऱ्या आणि सोशल मीडियावर पसरवणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

Goa Staff Selection Commission fake recruitment advertisement
Goa Weather Alert Update : गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

सोशल मीडियावर फिरणाऱ्या भरतीच्या जाहिरातींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि गोवा सरकार किंवा ''गोवा कर्मचारी निवड आयोग'' यांच्या भरतीसंबंधीची सर्व अधिकृत माहिती केवळ त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरूनच पडताळून पाहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com