vijay sardesai Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: लूटमारीच्या धंद्यात मंत्र्यांचे निकटवर्तीय सामील; कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन सरदेसाईंचा हल्लाबोल

Vijay Sardesai criticized Sawant Government: गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावर हल्लाबोल केला.

Manish Jadhav

मडगाव: राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावर राजकीय वादंग माजला आहे. विरोधकांनी या प्रकरणावरुन राळ उडवून दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र पोलीसचं या प्रकरणाची सखोल चौकशी करतील या भूमिकेवर सरकार ठाम आहे.

दरम्यान, आज (12 नोव्हेंबर) गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावर हल्लाबोल केला. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेच या प्रकरणात गुंतले असल्याचा घणाघात सरदेसाई यांनी केला. राज्यात सध्या माजलेली अनागोंदी पाहता सावंत सरकारला सत्तेत राहण्याचा काही एक अधिकार नसल्याचे म्हणत सरदेसाईंनी टीकास्त्र डागले.

मंत्री, आमदारासंह पदाधिकारी सामील!

दरम्यान, या प्रकरणात एक तर भाजपचे पदाधिकारी किंवा मंत्र्यांचे निकटवर्तीय सामील आहेत. याप्रकरणात आतापर्यंत ज्‍यांना अटक झाली आहे ते सर्व भाजपशी संबंधित लोक आहेत. सत्ताधारी पक्षाशी जवळीक असल्‍याचा फायदा उठवून या लोकांनी हा लूटमारीचा धंदा सुरु केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.

सरदेसाई म्हणाले की, ''ज्‍यांनी नोकरीसाठी पैसे दिलेत त्‍यांच्‍याप्रती मला किंचितही सहानुभूती नाही. कारण नोकरी मिळवण्‍यासाठी पैसे देऊन तेही या गुन्‍ह्यात सहभागी झाले आहेत. मला चिंता जर कुणाची वाटत असेल तर ती या नोकर्‍या मिळवण्‍यासाठी ज्‍या हजारो गोमंतकीय युवा-युवतींनी परीक्षा दिली आणि ते पात्र असतानाही त्‍यांच्‍या हातच्‍या नोकर्‍या अशा हिरावून घेतल्या गेल्या.''

आता याला अटक केली त्‍याला अटक केली असे सांगितले जाते. मात्र ज्‍या पात्र उमेदवारांवर अन्‍याय झाला त्‍यांचे काय असा सवाल करुन या युवकांना न्‍याय मिळायचा असेल तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवून ती नव्‍याने सुरु करण्‍याची गरज सरदेसाई यांनी पुन्‍हा एकदा व्‍यक्‍त केली. यासाठी आता राज्‍यपाल श्रीधरन पिल्‍लई यांनी हस्‍तक्षेप करुन ही भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणीही सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT